घरमनोरंजन"हा त्याचा शेवटचा वर्ल्डकप...", अभिनेत्री असलेल्या राहुल द्रविडच्या पुतणीने व्यक्त केले दुःख

“हा त्याचा शेवटचा वर्ल्डकप…”, अभिनेत्री असलेल्या राहुल द्रविडच्या पुतणीने व्यक्त केले दुःख

Subscribe

राहुल द्रविड याची पुतणी अभिनेत्री असून तिचे नाव अदिती द्रविड आहे. अदितीने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपले व्यक्त केले.

मुंबई : ICC Cricket World Cup 2023 च्या अंतिम सामन्यात भारताला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. विश्वचषकात सलग 10 सामने जिंकून सुद्धा भारताला शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पराभूत करत विश्वचषक 2023 स्वतःच्या नावे केला. यामुळे 140 करोड भारतीयांची मने दुखावली आहेत. स्वतः कर्णधार रोहित शर्मा याला त्याचे रडू आवरता आले नाही. त्याच्या डोळ्यातील अश्रु हे काल अनेकांनी पाहिले. तर अनेक भारतीय काल रडले सुद्धा अनेकांनी सोशल मीडियावर याबाबतची भावनिक पोस्ट करत भारतीय संघाच्या कामगिरीचे कौतुक केले. भारतीय संघाचा हेड कोच असलेल्या राहुल द्रविडच्या पुतणीने देखील याबाबत आपले दुःख व्यक्त केले आहे. राहुल द्रविड याची पुतणी अभिनेत्री असून तिचे नाव अदिती द्रविड आहे. अदितीने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपले व्यक्त केले. हा वर्ल्डकप त्याचा शेवटचा होता. तो प्रचंड मेहनती असून खूप कष्ट घेतो. मला वाटतं राहुल द्रविड हा सर्वोत्कृष्ट कोच आहे, असे तिच्याकडून सांगण्यात आले. (“This is his last World Cup…” opined Rahul Dravid’s nephew who is an actress)

हेही वाचा – Fact Check: ऑस्ट्रेलियाच्या उपपंतप्रधानानी कमिन्सचं अभिनंदन न केल्याचा व्हिडीओ व्हायरल; मात्र, सत्य काही वेगळेच..

- Advertisement -

यावेळी बोलताना अभिनेत्री अदिती द्रविड म्हणाली की, राहुल द्रविड हे माझे काका आहेत. माझे वडील क्रिकेटच्या फिल्डमध्ये गेल्या 30-35 वर्षांपासून कार्यरत आहेत. ते स्वत: रणजी ट्रॉफी प्लेअर आहेत. वडिलांच्या क्रिकेटमुळे राहुल द्रविड आणि माझे नाते खूप घट्ट होत गेले. आज राहुल द्रविडसाठी मला खूप वाईट वाटत आहे. हेड कोच म्हणून त्यांचीदेखील टर्म संपत आहे. हा वर्ल्डकप त्याचा शेवटचा होता. तो प्रचंड मेहनती असून खूप कष्ट घेतो. मला वाटते राहुल द्रविड हा सर्वोत्कृष्ट कोच आहे.

तसेच या सामन्याबद्दल बोलताना ती म्हणाली की, टॉसपासूनच गणित बिघडायला लागले होते. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा होता. टीम इंडिया खूप प्रयत्न करत होती. 240 पण होतील की नाही अशी शंका होती. सर्वच भारतीय टीम इंडियाला सपोर्ट करत होती. शेवटपर्यंत काहीतरी जादू व्हावी असे वाटत होते. याच्याआधीचे सर्व सामने आपण उत्कृष्ट खेळलो होतो. पण ऑस्ट्रेलियाची टीम खूपच कमाल खेळत होती. भारताचा पराभव झाल्यानंतर सर्व खेळाडूंना अश्रू अनावर झाले होते. क्रिकेटप्रेमींना ते चित्र पाहावत नव्हते. पण आता वर्ल्डकप चार वर्षांनी येणार आहे. त्यावेळची टीम अख्खी वेगळी असू शकते. काल सर्व भारतीयांना आपलाच वर्ल्डकप आहे, असे शेवटपर्यंत वाटत होते. माझे आतापर्यंतचे हे हर्ट झालेले हार्टब्रेक आहे. नाटकाच्या प्रयोगाप्रमाणे खेळदेखील एक प्रयोगच आहे, असेही तिच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

कोण आहे अदिती द्रविड?

अदिती द्रविड ही मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिने अनेक मालिकांमधून, चित्रपटांमधून आणि नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘सुंदरा मनामध्ये भरली’,’माझ्या नवऱ्याची बायको’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये तिने काम केले आहे. तसेच ‘गोष्ट एका पैठणीची’ या राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमातही तिने महत्ताची भूमिका साकारली होती. अभिनेत्री असण्यासोबत ती नृत्यांगणा आणि गीतकार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -