घरमुंबईयंदा गोविंदांच्या सुरक्षेसाठी मनसेचं 'चिलखत' तर भाजपकडून विमा

यंदा गोविंदांच्या सुरक्षेसाठी मनसेचं ‘चिलखत’ तर भाजपकडून विमा

Subscribe

दरवर्षी गोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर येतो पण आता त्यासाठी राजकीय पक्ष सुद्धा आता पुढे सरसावले आहेत. यावर्षी दहीहंडी उत्सव निर्बंधमुक्त झाले असले तरीही दहीहंडी मध्ये सहभागी झालेल्या सर्व गोविंदांची काळजी घेण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेने चिलखत योजना आणली आहे तर भाजपने सुद्धा १० लाखांचं विमा सुरक्षा कवच देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

यंदा दहीहंडी(dahi handi) उत्सवाचा आनंद दुप्पट होणार आहे. कोव्हिडच्या संकटामुळे मागील दोन वर्षांपासून दहीहंडी उत्सव साजरा झाला नव्हता. यावर्षी मात्र राज्य सरकारने दही हंडी उत्सवावरचे सर्व निर्बंध हटवले आहेत आणि सोबतच सरकारने सार्वजनिक सुट्टी सुद्धा जाहीर केली आहे. त्यामुळे यावर्षी दहीहंडी उत्सव निर्बंधमुक्त झाले असले तरीही दहीहंडी मध्ये सहभागी झालेल्या सर्व गोविंदांची काळजी घेण्यात येणार आहे.

दरवर्षी गोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर येतो पण आता त्यासाठी राजकीय पक्ष सुद्धा आता पुढे सरसावले आहेत. दहीहंडी दरम्यान गोविंदा जखमी होतात तर काही वेळा त्यांचा मृत्यू होतो. अशावेळी त्यांच्या परिवाराची अवस्था बिकट होते. याच पार्श्वभूमीवर मनसेने(mns) चिलखत योजना आणली आहे तर भाजपने(bjp) सुद्धा १० लाखांचं विमा सुरक्षा कवच देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

हे ही वाचा –  ठाण्यात दहीहंडी उत्सवासाठी लाखोंची बक्षिसे, गोविंदा मंडळांमध्ये मोठी चुरस

मनसेची चिलखत योजना; १ हजार गोविंदांना मिळणार विमा कवच

दहीहंडीच्या दिवशी अनेक गोविंदांना दुखापत होते याच पार्श्वभूमीवर दहीकाल्याच्या दिवशी नवी मुंबईमधल्या अपघातग्रस्त गोविंदांना मनसेकडून ‘सुरक्षा कवच’ देण्यात येत आहे. या योजने अंतर्गत दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे रचणाऱ्या १ हजार गोविंदांचा १०० कोटींपर्यंतचा मोफाय विमा काढण्यात येणार आहे. ‘विमा सुरक्षा कवच’ योजनेतील विम्याची मुदत १९ ऑगस्टचा संपूर्ण दिवस असेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गोविंदा पथकांनी मंडळाच्या लेटरहेडवर सर्व गोविंदांची नाव, वय नोंदवून मनसेचे सीवूड मध्ये असलेल्या मध्यवर्ती कार्यालयात आणूं द्यावे. असं आवाहन माणसे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे(gajanan kale) यांनी केले आहे.

हे ही वाचा –  मुंबईकरांसाठी ‘बेस्ट’चे महत्वाचे दोन निर्णय; बस पाससह डबल डेकर ई – बस सेवा

भाजपकडून गोविंदांसाठी १० लाखांचा विमा

भाजपकडूनही गोविंदांसाठी १० लाखांचं विमा कवच सुद्धा देण्यात आलं आहे. दहीहंडी दरम्यान अनेक गोविंदांना पडल्यामुळे त्यांना त्यांचे अवयव सुद्धा काही वेळेस गमवावे लागतात. त्यांची काळजी आपणच केली पाहिजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून दहीहंडी उत्सवातील गोविंदांसाठी १० लक्ष रुपयांचा विमा देणार असल्याचे भाजप मुंबईने जाहीर केलं आहे. त्याप्रमाणे यात अनेकांनी सहभाग घ्यावा असं भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केले.

मनसेचे गजानन काळे आणि भाजपचे आमदार नितेश राणे(nitesh rane ) यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. त्यामुळे गोविंदा पथकातील गोविंदांना सुरक्षेचं कवच मिळणार आहे.

हे ही वाचा – जे. पी. नड्डांचे ‘ते’ विधान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खुलासा

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -