घरमुंबईयंदाची दिवाळी पहाट ऑनलाईन

यंदाची दिवाळी पहाट ऑनलाईन

Subscribe

यंदाचे वर्ष सुरू झाले ते कोरोनाच्या सावटाने. फटाक्यांवर आवाजाची मर्यादा, सार्वजनिक कार्यक्रमासाठी गर्दीचे बंधन आणि प्रवासाच्या मर्यादा यासारख्या अनेक अटी शर्थींसह यंदाचा दिवाळीचा सण आलेला आहे. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांना फुल्ल हाऊस गर्दी करणार्‍या रसिकांचा मात्र यंदा हिरमोड झालेला आहे. अनेक आयोजकांनी यंदाची दिवाळी पहाट ही ऑनलाईन पद्धतीनेच साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवाळी पहाटचा आस्वाद यंदा चाहत्यांना घरच्या घरीच ऑनलाईन स्वरूपातून घेता येणार आहे.

एकमेकांना शुभेच्छा देऊन शास्त्रीय संगिताच्या मैफिलीत रंगणारा दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे दिवाळी पहाट. कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता या वर्षीचा दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजकांकडून व्हर्चुअल म्हणून साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे संगीत प्रेमींना सुरांची मेजवानी ऑनलाइन पद्धतीने मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीसाठी राज्य शासनाकडून नियमावली तयार करण्यात आली. ज्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन ऑनलाइन करण्याचे आदेश दिले आहेत. दिवाळी पहाट म्हणजे तरुणांना मिळालेलं एक हक्काच व्यासपीठ आहे.

- Advertisement -

दिवाळ पहाटचा मुख्य उद्देश हा एकत्रित येऊन दिवाळीचे स्वागत करणे असा आहे. भक्तीगीते, भावगीतांबरोबरच काही लोकप्रिय गाण्यांचा आनंद घेत दिवाळी पहाट साजरी करण्याचा आनंद काही औरच. पण यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने इतर सणांप्रमाणेच दिवाळी पहाटही ऑनलाईन साजरी होणार आहे. कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणार्‍या दोन संस्थांनी एकत्र येऊन दोन दशकांपूर्वी दिवाळी पहाटच्या मैफिली आयोजित करायला सुरुवात केली. शास्रीय संगीत, भावगीत त्याचबरोबर जुन्या सदाबहार गाण्यांच्या मैफिलीनी दिवाळी पहाट रंगून जाते. या कार्यक्रमात ज्येष्ठांसोबतच तरुणाईंचा मोठा उत्साह पहायला मिळतो. दिवाळी पहाट ही अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे; पण यंदा मात्र या दिवाळी पहाटच्या ट्रेंडमध्ये पहिल्यांदाच खंड पडणार आहे. सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाणारे ठाणे, डोंबिवली येथे दिवाळी पहाट कार्यक्रमांची मोठी रेलचेल पहायला मिळते. दक्षिण मुंबईच्या गिरगावातही दिवाळी पहाट ही मोठ्या उत्साहाने आणि पारंपरिकरित्या साजरी केली जाते. मात्र, या वर्षी हा संपूर्ण उत्साह आता ऑनलाइन मंचावरून पाहता येणार आहे.

दिवाळी पहाट आता ऑनलाइन रंगणार असली तरुणाईंचा उत्साह कुठेही कमी झालेला नाहीय. दिवाळी पहाट कार्यक्रमांची तयारी एक महिना आधीच सुरू होते. यावेळी प्रक्षेपण ऑनलाइन असले तरी तरुणांनी त्याची तयार ही एक महिना आधी सुरू केली आहे. काही आयोजकांनी दिवाळी पहाटेचे रेकॉर्डींग करून ठेवले आहे. तर काही जण लाईव्ह स्ट्रिमिंग करून दिवाळी पहाट प्रेक्षकांसमोर आणणार आहेत. प्रत्यक्ष कार्यक्रम आणि आभासी कार्यक्रम यात खूप तफावत आहे. त्यामुळे प्रेक्षक संख्या किती मिळेल याबाबत संयोजकांना ही शंका आहे. असं असली तरी ऑनलाइन प्रणालीमुळे देशाबाहेरील प्रेक्षकही दिवाळी पहाट कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकणार आहेत. दिवाळी पहाट कार्यक्रमांना असलेली परंपरा त्यामागचा संदेश आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवता येणार आहे.

- Advertisement -

दिवाळी पहाट आणि डोंबिवलीच्या फडके रोडचे वेगळे नाते आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी नटून थटून फडके रोड येऊन तरुणाई ढोल ताशांच्या जल्लोषात दिवाळी पहाट साजरी केली जाते. मुंबई पुण्यातही दिवाळी पहाटचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतात. अनेक गायक, गायिका, सिनेअभिनेते आपली कला सादर करतात. यावर्षी मात्र ढोल ताशांच्या गजरात हिंदी मराठी गाण्यावर थिरकणार्‍या तरुणांचा जल्लोष पाहता येणार नाही. असे असले तरी लोकांमधला उत्साह कमी झालेला नाही. डिजिटल प्लॅटफॉर्मवर यंदा दिवाळी पहाट साजरी करण्यात येणार आहे.

ठाणे, डोंबिवली ही महाराष्ट्रातील सांस्कृतिक शहरे आहेत. या ठिकाणी मोठ्या संख्येने दिवाळी पहाटचे कार्यक्रम रंगतात. ठाण्यातील तलाव पाळीजवळ दिवाळी पहाट साजरी करण्यासाठी तरुणांचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. ठाण्यातील दिवाळीचा एक मोठा सोहळा येथे पाहायला मिळतो. तरूण पिढी तसेच ज्येष्ठ मंडळी जमा होऊन एकमेकांना शुभेच्छा देत असतात. त्याचप्रमाणे डोंबिवलीच्या फडके रोडवरही तरुणांचा उत्सव असतो. या वर्षी मात्र दिवाळ सण तोंडावर आला असला तरी दिवाळी कार्यक्रमांची लगबग पहायला मिळत नाहीय. ना कोणत्या चर्चा ना जाहिराती. मुंबई पुण्यातील गजबजलेली ठिकाणे या दिवाळीत मात्र ओस दिसणार आहेत. तसेच अनेक नाट्यगृहांमध्ये सुरांच्या दुनियेत दिवाळी पहाट रंगली जाते. यावर्षी मात्र कोरोनाचे सावट असल्याने नाट्यगृहांची दिवाळ पहाटही सुनी सुनी असणार आहे.

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -