घरमुंबईजे मोदी सरकारविरोधक सकारात्मक असतील, ते आमच्यासोबत येतील - नाना पटोले

जे मोदी सरकारविरोधक सकारात्मक असतील, ते आमच्यासोबत येतील – नाना पटोले

Subscribe

मुंबई : सोनिया गांधीना (Sonia Gandhi) ईडीकडून चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी  (Rahul Gandhi) यांचे लोकसभा सदस्यत्व गेले आहे, त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, भाजपा विरोधात आम्हाला कोणत्याही पक्षाला फरफटत आणि जबरदस्ती एकत्र आणायचे नाही आहे. जे सकारात्मक या युद्धामध्ये असतील ते आमचे सोबती असतील.

नाना पटोले म्हणाले की, देशाच्या संविधानिक व्यवस्थेला आणि लोकशाहीला संपवण्याचा जो प्रयत्न केंद्रातल्या नरेंद्र मोदींच्या भाजपा सरकारने सुरू केला आहे. त्या सरकारच्या विरोधात जे कोणी लढणारे लोक असतील त्यांना सोबत घेऊन चायालची आमची भूमिका आहे. लोकशाही व्यवस्था संपवण्याचे काम नरेंद्र मोदींचं केंद्रातले सरकार करत आहे. त्याच्याविरोधात आमची लढाई आहे आणि काँग्रेस ही लढाई प्रत्येक स्तरावर लढते आहे. याचे परिणाम आम्हाला भोगावे लागत असल्याचे नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

पटोले यांनी केंद्र सरकारवर आरोप करताना म्हटले की, राहुल गांधींवर खोटे आरोप लावून त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले, त्यांना बेघर करण्यात आले आणि सोनिया गांधीवर खोटे आरोप लावून ईडीकडून चौकशीसाठी बोलावले जात आहे. तरीही आम्ही देशहितासाठी जो काही त्रास सध्या नरेंद्र मोदींचं भाजपाचं सरकार देत आहे, या त्रासाच्या पुढे काँग्रेस पक्ष जात आहे. आमची लढाई भाजपाविरोधात आहे. कारण हा पक्ष देशहिताच्या विरोधात आहे. त्याच्यामुळे आम्हाला कोणत्याही पक्षाला फरफटत आणि जबरदस्ती एकत्र आणायचं नाही आहे. जे सकारात्मक या युद्धामध्ये असतील ते आमचे सोबती असतील, असा विश्वास नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

भाजपाविरोधात ‘वन इज टू वन’ फॉर्म्युल्याची गरज
जेव्हा सर्व विरोधी पक्ष एकत्रितपणे एका मजबूत पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध एकच उमेदवार उभे करतात तेव्हा त्याला ‘वन इज टू वन’ असे म्हणतात. हा फॉर्म्युला माजी गव्हर्नर सत्यपाल मलिक यांनी  २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी दिला आहे. भाजपाच्या उमेदवारासमोर विरोधी पक्षांनी एकच उमेदवार उभा केला तर, भाजपाचा पराभव निश्चित आहे, असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला. याशिवाय मुख्यमंत्री नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी यांनीही विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -