घरमुंबईलॉकडाऊनमध्ये मुंबईत हाजारो चिमुकल्यांनी गमावला जीव

लॉकडाऊनमध्ये मुंबईत हाजारो चिमुकल्यांनी गमावला जीव

Subscribe

मुंबईसारख्या शहरातून समोर आलेली आकडेवारी सर्वात जास्त

कोरोनामुळे सगळ्यांचे जनजीवन विस्कळीत असताना पुन्हा सर्व परिस्थिती कधी नॉर्मल होणार याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनदरम्यान, असं काही घडलं की जे ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल…कोरोना लॉकडाऊनमध्ये हजारो नवजात चिमुकल्यांचा जीव गेल्याची माहिती समोर आले आहे. RTI अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात फेब्रुवारी ते डिसेंबर २०२० दरम्यान तब्बल १२ हजार १७९ नवजात बालकांचा मृत्यू झाला, तर चिंताजनक म्हणजे मुंबईसारख्या शहरातून समोर आलेली आकडेवारी सर्वात जास्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई, अकोला, औरंगाबाद, नाशिक, नागपूर आणि पुण्यात ४ हजार ४११ नवजात चिमुकल्यांचे मृत्यू झाले आहे. जे प्रमाण एकूण मृत्यूच्या ३६.२२ टक्के आहे. मुंबईमध्ये सर्वात जास्त म्हणजे १ हजार ९७ मृत्यू झाले आहे. त्यानंतर अकोला ७८३, औरंगाबाद ७२९, नाशिक ६६४, नागपुर ५८७ आणि पुण्यात ५५१ मुलांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, समर्थन ही संस्था मानव अधिकार आणि कुपोषणाबाबत काम करते. महाराष्ट्रात २०२० मध्ये नवजात बालकांचा मृत्यू झाला असून एक ते पाच वर्षे वयाच्या मुलांच्या मृत्यूची संख्या १ हजार ८७२ आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी ते डिसेंबर देशात लॉकडाऊन होता. यादरम्यान झालेल्या चिमुकल्यांच्या मृत्यूंची संख्या ही अधिक धक्कादायक असल्याचे संस्थेने सांगितले. तसेच या संस्थेतर्फे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना एक पत्र सादर केल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये नवजात बालकांच्या मृत्यूची आकडेवारी आणि कारणं दिली आहेत. वेळेआधी बाळाचा जन्म, कुपोषित आई आणि बाळ, संक्रमण, न्युमोनिया, श्वास घ्यायला त्रास अशा समस्यांचा समावेश आहे. शहरी क्षेत्रातील मृत्यूची अधिक संख्या असणे ही चिंतेची बाब असून यावर योग्य ती उपाययोजना करण्यासंदर्भात पत्रात नमूद केले आहे.


नवजात बाळाला लगेच घराबाहेर नेऊ नका! वाचा कारण

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -