घरमुंबई'ही तर एक झलक, पुढच्या वेळी कुटुंबालाच उडवू', अंबानींना धमकीचं पत्र

‘ही तर एक झलक, पुढच्या वेळी कुटुंबालाच उडवू’, अंबानींना धमकीचं पत्र

Subscribe

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनचा साठा सापडल्यानंतर मुंबई पोलीस, फॉरेन्सिक टीम, आणि श्वानपथकं घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. या स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली असून त्यामधून घातपाताची धमकी दिल्याचे समोर आले आहे. पोलीस आणि तपास यंत्रणांकडून सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचं काम सुरु आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या पत्रात असे लिहिले आहे की, “नीता भाभी आणि मुकेश भैय्या कुटुंबीय, ही तर एक झलक आहे. पुढच्या वेळी हे सामान पूर्ण येईल आणि संपूर्ण कुटुंबाला उडवून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, काळजी घ्या.” वृत्तसंस्थेने पोलीस सुत्रांच्या हवाल्याने असे सांगितले की, कार पार्क करणाऱ्या एका व्यक्तीने साधारण एक महिन्यासाठी त्या परिसराची रेकी केली होती.

असे म्हटले होते धमकीच्या पत्रात…

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर पार्क केलेल्या गाडीत स्फोटकांच्या बॅगसोबत एक पत्रही पोलिसांनी मिळाले. या पत्रातून मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देण्यात आली आहे. ‘डियर नीता भाभी और मुकेश भैय्या और फॅमिली.. ये तो सिर्फ ट्रेलर है अगली बार ये सामान पुरा हो क्या आयेगा तुम्हारे फॅमिली को उडाने….संभल जाना…’, असा मजकूर या पत्रात असल्याचे समजते.

- Advertisement -

गाडीत काही बनावट नंबर प्लेट आढळल्या

पोलिस जवळपास बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज शोधत आहेत. गाडीवरील नंबर प्लेट, त्याची नंबर अंबानीच्या घरात वापरल्या जाणार्‍या मोटारीसारखीच असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार कारमध्ये अनेक नंबर प्लेट्स सापडल्या आहेत. तसेच गाडीला वापरलेली नंबरप्लेटही बनावट आहे. याप्ररणी मुंबई पोलिसांचे दहा पथकं संपर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. दोन पथकं परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी करत आहेत.

सापडलेल्या स्फोटकाप्रकरणी FIR दाखल

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटेलिया या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने आज संध्याकाळच्या सुमारास एकच खळबळ उडाली. याप्रकरणी काही तासांनंतर मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदविल्याचे वृत्त आहे. दरम्यान, कार्मिकल रोडवरील अल्ट्रा-लक्झरी इमारत अँटेलियाच्या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ पार्क केलेल्या दोन व्यक्तींचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. गामदेवी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर नोंदविण्यात आला.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -