दाऊद छापा प्रकरणी एनआयएकडून माहिम आणि हाजी अली दर्ग्याच्या ट्रस्टीसह तीन जणांना अटक

एनआयएने माहिम आणि हाजी अली दर्गाचे ट्रस्टी सुहैल खंडवानी यांच्यासह तीन जणांना अटक केली आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या निकटवर्तियांवर आज एनआयएने कारवाई केली असून याअंतर्गत मुंबईतील २० ठिकाणी छापे घालण्यात आले.  यादरम्यान, एनआयएने माहिम आणि हाजी अली दर्गाचे ट्रस्टी सुहैल खंडवानी यांच्यासह तीन जणांना अटक केली आहे. यात छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रुट याचाही समावेश आहे. खंडणीच्या नावाखाली पैसे गोळा करून देशविरोधी कारवायांसाठी त्यांचा वापर केल्याच्या आरोपाखाली हे छापासत्र सुरू आहे.

दाऊदचा साथीदार छोटा शकील, बहीण हसीना पारकर, जावेद चिकना, टायगर मेनन, इक्बाल मिर्ची, यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या ठिकाणांवर एनआयएने ही छापेमारी केली आहे. आज सकाळपासूनच ही छापेमारी सुरू आहे. यात बोरिवली, गोरेगाव, बांद्रा, सांताक्रुझ, नागपाडा, भेंडी बाजार,परळ, मुंब्रा आणि कोल्हापूर या ठिकाणी ही छापेमारी करण्यात येत आहे.

सलीम फ्रूट हा छोटा शकीलचा मेव्हणा आहे. आपल्या साथीदारांसह तो खंडणी वसुलीच काम करतो. २०१० पासून तो जेलमध्ये आहे. त्याला तेथूनच अटक करण्यात आली आहे.