घरमुंबई25 लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी तिघांना अटक

25 लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी तिघांना अटक

Subscribe

सुमारे 25 लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी तीन आरोपींना वर्सोवा पोलिसांनी अटक केली. विष्णू अमृतलालजी पुरोहित, महेशकुमार भुपानी राजगोर आणि हितेशकुमार सावळाराम पुरोहित अशी या तिघांची नावे आहेत. यातील विष्णू हा तक्रारदार व्यापार्‍याचा नोकर असून त्याने इतर दोन मित्रांच्या मदतीने या चोरीचा बनाव केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत तिन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

प्रविण उदयलाल जैन हे व्यवसायाने सोन्याचे व्यापारी असून ते अंधेरीतील लोखंडवाला संकुल, स्वामी समर्थ रोडवरील एका निवासी अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचा त्याच परिसरात शिल्पी ज्वेलर्स नावाचे एक दुकान आहे. त्यांच्याकडे विष्णू पुरोहित हा कामाला होता. सप्टेंबर महिन्यात त्यांनी विष्णूला एका व्यापार्‍याकडून काही पैसे आणायला पाठविले होते. तसेच काही दागिने दाखविण्यासाठी दिले होते. त्यानंतर त्याने एका व्यापार्‍याकडून 25 लाख रुपये घेतले होते. ही रक्कम, सोन्याचे दागिने आणि इतर मुद्देमाल घेऊन तो अंधेरीतील वर्सोवा, कब्रस्तानजवळ गेला होता. यावेळी दोन अज्ञात तरुणांनी त्याचे लक्ष विचलित करुन हा मुद्देमाल घेऊन पलायन केले होते.

- Advertisement -

या घटनेची माहिती नंतर त्याच्या मालकाला दिली. त्यानंतर त्यांनी वर्सोवा पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. तपासात विष्णू पुरोहितला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीत तो विसंगत माहिती देत होता. घटना घडल्यानंतर त्याने उशिराने ही माहिती मालकांना दिली होती. त्यामुळे त्याची कसून चौकशी केली असता त्याने ही चोरी त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने केल्याचे उघडकीस आले. या चौकशीनंतर महेशकुमार राजगोर आणि हितेशकुमार पुरोहित या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. यातील महेशकुमार हा गुजरात तर विष्णू व हितेशकुमार हे राजस्थानचे रहिवाशी आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -