घरCORONA UPDATECoronavirus Mumbai: वर्सोवा कोळीवाड्यात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू

Coronavirus Mumbai: वर्सोवा कोळीवाड्यात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू

Subscribe

राज्यासह देशात सध्या कोरोनाचे संकट असताना राज्यात आणि विशेषतः मुंबईमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. मुंबईत तर ही आकडेवारी सर्वाधिक असून, गेल्या दोन दिवसात मुंबईमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहे. याचमुळे वाढते कोरोनाचे रुग्ण लक्षात घेता वर्सोवा कोळीवाड्यात जनता कर्फ्युची घोषणा करण्यात आली असून, येत्या २४, २५ आणि २६ एप्रिलला वर्सोवा कोळीवाड्यात हा कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. वर्सोवा कोळी जमात संघटनेची आज बैठक पार पडली त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

म्हणून घेतला जनता कर्फ्युचा निर्णय

दरम्यान वर्सोवा कोळीवाड्यात आतापर्यंत कोरोनाचे १७ रुग्ण आढळले असून, ५ रुग्ण आता उपचार घेऊन पूर्ण बरे होऊन स्वतःच्या घरी परतण्याचा स्थितीत आहेत. याचमुळे या प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी वर्सोवा कोळी जमात संघटनेने एकमताने तीन दिवस जनता कर्फ्यु लावण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

मच्छीमारांचे कोट्यवधींचे नुकसान

विशेष म्हणजे लॉकडाऊनचा फटका जसा इतर उद्योगांना बसला आहे, तसाच फटका मच्छीमार बांधवांना देखील बसला आहे. गेला एक महिना मासेमारी व्यवसाय बंद आहे. तसेच वर्सोवा कोळीवाड्यात बऱ्याच जणांचे पोट या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे मागील महिन्या भरापासून मच्छीमारी बंद असल्याने मच्छीमारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -