घाटकोपरमध्ये केमिकल टाकीत गुदमरून एकाचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर

रुबीन डिंगकर आणि श्रावण सोनावणे या कामगारांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

three employees labours suffocation in chemical tank at ghatkopar mumbai one labours dead and two injured
घाटकोपरमध्ये केमिकल टाकीत गुदमरून एकाचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर

मुंबईतील घाटकोपर परिसरातील एका कंपनीत केमिकल टाकी साफ करताना तीन कामगार गुदमरल्याची घटना घडली आहे. यात एका कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घाटकोपरमधील एस के डायस्टफस केमिकल कंपनीत तीन कामगार सोमवारी सकाळी केमिकल टाकी साफ करत होते. याावेळी टाकीतील विषारी वायू नाकातोंडात गेल्याने कामगार गुदरमरले. यात रामनिगोर सरोज या कामगाराचा मृत्यू झाला. तर रुबीन डिंगकर आणि श्रावण सोनावणे या कामगारांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर पश्चिम येथील कुर्ला औद्योगिक वसाहतीमधील एस के डायस्टफस केमिकल कंपनीत सोमवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. यावेळी टाकीतील मिथेनॉल आणि सायन्युरिक क्लोराईड गॅसमुळे तीन कामगार गुदमरल्याची माहिती प्रशासनाला देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत टाकीतून तीन कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. दरम्यान यातील एका कामगाराचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळी सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र रुग्णालयात पोहचताच एका कर्मचाऱ्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.


Corona Update: देशात कोरोनाचा प्रकोप, रुग्णसंख्या दीड लाख पार, मात्र मृतांचा आकडा घटला