‘पुणे-मुंबई एक्सप्रेस वे’वरील भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

accident
अपघात

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर गुरुवारी दुपारी कारचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटला आणि पाठीमागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने कारला चिरडले, यावेळी हा कंटेनर समोरून येणाऱ्या ट्रकला देखील धडकला. सध्या सोशल मीडियावर या अपघाताचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अशी घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, खोपोली जवळील हद्दीत पुणे-मुंबई एक्सप्रेसवरील भीषण अपघात झाला. या अपघातात कुटुंबातील आई, वडील आणि मुलाचा मृत्यू झाला. अवघ्या २७ सेकंदात कारवरील ताबा सुटल्याने पुणे- मुंबई एक्सप्रेस वे’वर हा भीषण अपघात झाला. या घटनेचा व्हिडिओ कॅमेरामध्ये शूट करण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी ही घटना घडली होती. त्यानंतर व्हिडिओतून या अपघाताची गंभीर भीषणता समोर आली आहे.

या भीषण अपघातात कारने प्रवास करत असलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात कंटेनर देखील उलटल्याने चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळतेय.


कंगनाचा दावा खोटा आणि कोर्टाची दिशाभूल करणारा; जावेद अख्तर यांचा आरोप