घरCORONA UPDATEमहापालिकेच्या आणखी तीन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

महापालिकेच्या आणखी तीन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

Subscribe

जीटीबी रुग्णालयातील कक्ष सहायक यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर बुधवारी केईएम रुग्णालयातील मुख्य सुरक्षा रक्षक तसेच ‘ई’ विभागातील कामाठीपुरा चौकी क्रमांक १ मधील कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या उपाययोजनांसाठी कार्यरत असलेल्या महापालिकेच्या आणखी तीन कर्मचाऱ्यांचा ‘कोरोना’ने जीव घेतला आहे. जीटीबी रुग्णालयातील कक्ष सहायक यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर बुधवारी केईएम रुग्णालयातील मुख्य सुरक्षा रक्षक तसेच ‘ई’ विभागातील कामाठीपुरा चौकी क्रमांक १ मधील कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत महापालिकेच्या सुमारे ९ ते १० कर्मचारी, अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय दोन कंत्राटी व रोजंदारीवरील कामगारांचाही मृत्यू झाला आहे.

मुंबई महापालिकेच्या अत्यावश्यक सेवांसह बिगर अत्यावश्यक सेवांचे कामगार, कर्मचारी व अधिकारी हे कारोनाच्या उपायययोजनांसाठी रस्त्यांवर उतरुन काम करत आहेत. मात्र, आतापर्यंत कोरोनाची लागण महापालिकेच्या अनेक कर्मचाऱ्यांना होत असून यासर्वांची माहिती प्रशासनाकडून लपवली जात आहे. महापालिका मुख्यालयातच सर्वांधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. सुरक्षा विभागासह महापालिका मुख्यालयातील आपत्कालिन नियंत्रण कक्ष तसेच इमारत प्रस्ताव विभाग, दक्षता विभाग आदीसह विविध विभाग कार्यालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत.

- Advertisement -

बुधवारी भायखळा ई विभागातील सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि त्यांच्या संपर्कातील कामगार वर्ग अशाप्रकारे सुमारे ८ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह म्हणून आल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय अन्य विभागांमध्येही अशाचप्रकारे कर्मचारी,कामगार कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. दरम्यान बुधवारी केईएम रुग्णालयातील मुख्य सुरक्षा रक्षक यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. तर ई विभागातील कामाठीपुरा येथील चौकी क्रमांक १ मधील कर्मचाऱ्याचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दोन दिवसांपूर्वी शिवडी क्षयरोग रुग्णालयातील कक्ष सहायक पदावरील कर्मचाऱ्याचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या सुमारे ९ ते १० कायम कर्मचारी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या जी-उत्तर विभागातील धारावीत जेवणाचा वाटप करणाऱ्या करनिर्धारणा व संकलन विभागाचे निरिक्षकाचा कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला होता.

तर लोकमान्य टिळक सर्वसामान्य महापालिका रुग्णालयातील रोजंदारीवरील एका आयाबाईंचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर त्यापूर्वी कचरा वाहनाच्या कंत्राटी चालकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे रोजंदारीवरील तसेच कंत्राट कामगार आदी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -