घरCORONA UPDATEधक्कादायक! मुंबईत हॉस्पिटलमधील तीन नवजात बालकांना कोरोना

धक्कादायक! मुंबईत हॉस्पिटलमधील तीन नवजात बालकांना कोरोना

Subscribe

मुंबईतील वाडिया हॉस्पिटलमधील तीन नवजात बालकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्या बालकांची आई कोरोना पॉझिटिव्ह असल्याने या चिमुकल्यांनाही कोरोना झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई मिरर या इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार, आईमुळेच बालकांना कोरोना झाले आहे की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे कोरोनाची नेमकी लागण चिमुकल्यांना कशामुळे झाली आहे, याचा शोध घेण्याचे आव्हान आता डॉक्टर, संशोधकांसमोर असणार आहे. कोरोनाचा संसर्ग आणखी कोणत्या पद्धतीने होत आहे, याचाही सखोल अभ्यास या निमित्ताने होते गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

वाडिया हॉस्पिटलमधून या तीन नवजात बालकांना कोरोनाची लागण असल्याची माहिती मुंबई महापालिका तसेच आयसीएमआरला देण्यात आली आहे. या बालकांचे स्वॅब चाचणीकरता जन्मल्यानंतर २४ तासांच्या आत घेण्यात आले होते. त्यामुळे जन्मानंतर त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या तीन बालकांव्यतिरिक्त वाडिया हॉस्पिटलमध्ये आणखी दोन नवजात बालकांवर कोरोना पॉझिटिव्ह असल्याने उपचार सुरू आहेत. त्या दोन बालकांना त्यांच्या आईपासून कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले जात असून गेल्या आठवड्यात ते वाडियामध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर त्या बाळांचे स्वॅब चाचणीकरता पाठवण्यात आले होते.

- Advertisement -

दरम्यान, मुंबईमध्ये कालच्या दिवशी १ हजार २६९ नवे कोरोना रुग्ण आढळले असून ११४ जणांचा त्यामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या ६४ हजार ०६८ इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे ११४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ३४२३ वर पोहोचला आहे. मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

हेही वाचा –

आर्थिक मंदीच्या काळात ‘या’ ठिकाणी ‘पार्ले-जी’चे उत्पादन २० ते २५ टक्क्यांनी वाढले!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -