वरळीत भीषण अपघात; ६ महिन्यांच्या मुलीसह आईला गमावले

वरळी येथे भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये तीन जणांचा समावेश अससल्याची माहिती समोर आली आहे.

three people were killed in the accident In Worli

मुंबई येथील वरळी परिसरात कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन वृद्ध महिला आणि सहा महिन्यांच्या मुलीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये कार चालक महिलेने आपल्या ६ महिन्यांच्या मुलीसह आईला गमावले आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार; नमिता चांद या कार चालक वरळीच्या दिशेने जात होत्या. त्यांची बीएमडब्ल्यू कार भरधाव चालली होती. अचानक गाडीवरील नियंत्रण सुटून ही कार स्पीड ब्रेकरवर चढली आणि भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर कार चालक नमिता चांद या गंभीर जखमी झाल्या आहेत. सध्या त्यांच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, नमिता या अंधेरीतील राहणाऱ्या असून अपघातात त्यांना आपल्या आईला आणि मुलीला गमवावे लागले आहे. या अपघातामध्ये सहा महिन्याची मुलगी, ७० वर्षीय आई आणि ६२ वर्षीय नातेवाईक यांचा समावेश आहे. तर या अपघातामध्ये गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे.


हेही वाचा – केईएममध्येही कस्तुरबासारखी रक्त तपासणी प्रयोगशाळा