Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे शिडी सरकल्याने तीन रेल्वे कर्मचारी भाजले

शिडी सरकल्याने तीन रेल्वे कर्मचारी भाजले

ओव्हरहेड तारेचे काम करताना दुर्घटना

Related Story

- Advertisement -

टिटवाळा आंबिवली रेल्वे स्थानकांच्या मधोमध शिडी लावून ओव्हरहेड वायरचे दुरुस्तीचे काम सुरू असतानाच अचानक शिडी सरकल्याने या दुर्घटनेत तीन कर्मचारी भाजले. ही घटना शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. जखमींना कल्याण आणि भायखळा येथील रेल्वे रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याचे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

हे कर्मचारी नेहमीप्रमाणे आंबिवलीच्या दिशेने जात असणार्‍या ओव्हरहेड वायरचे रुटींगचे काम शिडीवर उभे राहून करत होते. मात्र, अचानक शिडी सरकल्याने शिडी दुसर्‍या ओव्हरहेड वायरवर पडली. या दुर्घटनेत तिघे कर्मचारी वायरचा शॉक लागून भाजले असून खडवली येथे राहात असणारा महेंद्र शेलार या दुर्घटनेत जास्त भाजल्याने त्याला भायखळा येथील रेल्वे रुग्णालयात दाखल केले.

- Advertisement -

तर सचिन भट आणि श्रवण कुमार हे किरकोळ भाजल्याने त्यांना कल्याणच्या रेल्वे रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम हे तीन कर्मचारी करीत होते. तिघेही शिडीवर उभे राहून काम करीत होते. तोल गेल्याने आणि शिडी सरकल्याने शिडी ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आली आणि कर्मचार्‍यांना शॉक लागून ते जखमी झाले.

- Advertisement -