घरमुंबईअवयवदान दिन : मुंबईत ३५०० रुग्ण आजही किडनीच्या प्रतिक्षेत

अवयवदान दिन : मुंबईत ३५०० रुग्ण आजही किडनीच्या प्रतिक्षेत

Subscribe

मरणानंतर कोणाला तरी आयुष्य नव्याने जगता यावं, यासाठी अवयवदान करणं फारच महत्त्वाचं आहे. पण, अवयव दानाबाबतच्या असलेल्या बऱ्याच गैरसमजुतीमुळे अवयवदानासाठी लोकं पुढाकार घेत नाही. त्यातही सर्वात मोठी प्रतिक्षा यादी ती म्हणजे किडनी या अवयवासाठी आहे.

मरणानंतरही अवयवरुपी जीवंत राहण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे अवयवदान. आपल्या मरणानंतर कोणाला तरी आयुष्य नव्याने जगता यावं, यासाठी अवयवदान करणं फारच महत्त्वाचं आहे. १३ ऑगस्ट हा अवयवदान दिन म्हणून पाळला जातो. मानवी शरीरातील हृदय, फुफ्फुस, यकृत, किडनी, त्वचा, डोळे आणि हात हे अवयव दान केले जाऊ शकतात. पण, अवयव दानाबाबतच्या असलेल्या बऱ्याच गैरसमजुतीमुळे अवयवदानासाठी लोकं पुढाकार घेत नाही. त्यातही सर्वात मोठी प्रतिक्षा यादी ती म्हणजे किडनी या अवयवासाठी आहे.

किडनीची प्रतिक्षा यादी सर्वात मोठी

सध्या किडनी या अवयवाच्या प्रतिक्षा यादीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याची कारणंही वेगवेगळी आहेत. किडनीला होणारे आजार हे अनेकदा खूप उशिरा लक्षात येत असल्यामुळे याला सायलेंट किलर या आजाराने ही ओळखलं जातं. सध्या मुंबईत जवळपास ३ हजार ५०० जणांना किडनीची आवश्यकता आहे. विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षात एकूण ५३ अवयवदान पार पडली आहेत. त्यात सर्वात जास्त दान ही किडनीचंच करण्यात आलं आहे. त्यापाठोपाठ ४२५ जण यकृताच्या प्रतिक्षेत आहेत. तर, २५ जण हृदय, १२ जण फुप्फुस, ५ जणांना स्वादुपिंड आणि तिघांना हातांची गरज आहे.

- Advertisement -

मुंबईत किडनी करता रुग्णांची वाढती प्रतिक्षा

अवयवदानाची मागणी आणि अवयव उपलब्ध होणाऱ्या संख्येत मोठी तफावत आहे. वर्षाकाठी फक्त हजार ते १ हजार २०० अवयव दान केले जातात. पण, अवयवाच्या मागणीची संख्या लाखोंच्या घरात असते. एखाद्या ब्रेनडेड व्यक्तीच्या निधनानंतर कुटुंबियांच्या परवानगीनुसार किडनी, लिवर, हृदयाच्या झडपा, ह्रदय, हात, फुप्फुस आणि डोळे हे अवयव दान करता येतात. त्यातून, दुसऱ्याचा जीव वाचू शकतो.


हेही वाचा – अपघातांच्या तुलनेत अवयवदानाची संख्या कमी

- Advertisement -

दरवर्षी ५ लाख रुग्ण अवयव न मिळाल्याने मृत पावतात. यातील २ लाख रुग्णांना यकृत, ५० हजारांना हृदयाची गरज, दरवर्षी दिड लाख जणांना किडनीची गरज असते. पण, फक्त ५ हजार रुग्णांनाच किडनी मिळते. देशात १० लाख अंधरुग्ण नेत्रदानाच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे, अवयवदानाची चळवळ लोकांच्या मनामनात रुजली पाहिजे. दात्यांची संख्या वाढणं गरजेचं आहे. तरंच, वर्षोनवर्षे एका अवयवासाठी प्रतिक्षा यादीत असणाऱ्या रुग्णांच्या आयुष्यात नवीन पहाट उगवण्यास मदत होईल.

विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, १९९७ सालापासून ते ८ ऑगस्ट २०१९ पर्यंत १ हजार २६४ यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. त्यात हृदय १२३ , किडनी ७८७, यकृत ३३८ आणि फुप्फुस १६ हे अवयव दान करण्यात आले आहेत.

यंदाच्या वर्षी अवघ्या पाच महिन्यांत ३१० अवयव प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. पण, गरजूंच्या तुलनेत दात्यांची संख्या अजूनही कमी पडते आहे. यासाठी दात्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहेडॉ. लोबो गाजिवाला, ‘रोटोसोटो’ च्या (पश्चिम विभागीय) संचालक

किडनीविकार होऊ नये म्हणून काय कराल?

किडनीविकार हा बर्‍याचदा त्याच्या अंतिम स्तरात पोहचल्यावरच त्याची लक्षणं दिसून येतात. म्हणूनच योग्य वेळी लक्षण जाणा आणि धोका टाळा

  • दर १५ मिनिटांनी एक वाटी पाणी प्यावं.
  • १ तासांनी लघवी करावी.
  • सतत पेनकिल्रर्स घेतल्याने ही किडनीविकार उद्भवतात.
  • प्रोटिन्सचे अधिक सेवन टाळा.
  • इन्फेक्शनमुळे काही आजार झाले असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • रक्तातील वाढलेले साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी गोड खाण्यावर मर्यादा घाला. योग्य दिनचर्या, व्यायाम आणि आहार यामुळे किडनीसह सर्वच विकारांना प्रतिबंध घालता येतो.

    हेही वाचा – नेत्रदान श्रेष्ठ दान


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -