घरमुंबईतीन तृतीयपंथीय नदीत बुडाले

तीन तृतीयपंथीय नदीत बुडाले

Subscribe

दुर्गा पूजेनंतर खानिवडे गावातील तानसा नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेले तीन तृतीयपंथीय बुडाले असून गुरुवारी संध्याकाळपर्यंत त्यांचा शोध सुरू होता. यावेळी त्यांचे तीन सहकारी तृतीयपंथीय बचावले आहेत.

हारिका अंदुकोरी (वय ४०), प्राची आकुला (वय २३) आणि सुनीता पुरी (वय २७) अशी बेपत्ता असलेल्यांची नावे आहेत. तर कल्पना, सौंदर्या, लक्ष्मी हे तिघे जण सुदैवाने बचावले आहेत. खानिवडे गावात राहणारे हे सहा तृतीयपंथीय बुधवारच्या सर्वपित्री अमावस्येची पूजा केल्यानंतर गुरुवारी सकाळी दुर्गापूजेच्या पहिल्याच दिवशी खानिवडे येथील तानसा नदी पात्रात आंघोळीसाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने आरिका, प्राची, सुनीता पाण्यात बुडाले. तर कल्पना, सौंदर्या, लक्ष्मी लगेचच बाहेर आल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळताच विरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य सुरू केले आहे. विरार वसई महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने बुडालेल्या तिघांचा शोध घेत आहेत. गुरुवारी संध्याकाळी उशिरापर्यंत तिघांपैकी एकही जणाचा शोध लागला नव्हता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -