घरमुंबईमायलेकीला पाहून अश्लील शेरेबाजी करणारे तीन तरुण जेरबंद

मायलेकीला पाहून अश्लील शेरेबाजी करणारे तीन तरुण जेरबंद

Subscribe

मलबार हिल येथे राहणार्‍या एका मायलेकीला पाहून अश्लील शेरेबाजी करुन मानसिक त्रास देणार्‍या तीन तरुणांना मंगळवारी मलबार हिल पोलिसांनी अटक केली. अजय प्रदीप राय, आशितोष रमेश सिंग आणि बन्सीधर पवन झा अशी या तिघांची नावे असून ते तिघेही चालक म्हणून काम करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर या तिघांनाही बुधवारी लोकल कोर्टाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मलबार हिल येथे तक्रादार महिला तिच्या मुलीसोबत राहते. याच परिसरात राहणारे तिन्ही तरुण त्यांना सतत अश्लील शेरेबाजी करुन मानसिक त्रास देत होते. त्या दोघीही बाथरुममध्ये गेल्यानंतर त्यांना पाहून अश्लील संभाषण करीत होते. सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते, मात्र ते तिघेही जास्त त्यांना त्रास देऊन त्यांच्याशी अश्लील वर्तन करीत होते. त्यामुळे त्यांनी सोसायटीकडे चालक असलेल्या या तिन्ही तरुणांची तक्रार केली होती. या तक्रारीची सोसायटीने गंभीर दखल घेत त्यांना योग्य ती समज दिली होती. यापुढे अशी काहीही तक्रार आली की त्यांच्याविरुद्ध ठोस कारवाईची धमकी देण्यात आली होती. तरीही ते तिघेही त्यांना त्रास देत होते. ही मालिका सुरुच होती.

- Advertisement -

मंगळवारी ही महिला बाथरुममध्ये गेल्यानंतर त्यांनी पुन्हा तिला पाहून अश्लील शेरेबाजी केली होती. त्यानंतर सायंकाळी तिची मुलगी कामावरुन घरी आल्यानंतर तिने तिला हा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी मलबार हिल पोलिसांत या तिन्ही तरुणांविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच अजय राय, आशितोष सिंग आणि बन्सीधर झा या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना बुधवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -