घरमुंबईदिंडीतून दिले अवयवदानाचे धडे

दिंडीतून दिले अवयवदानाचे धडे

Subscribe

आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुंबईत ‘अॅपेक्स किडनी फाउंडेशन’ च्या माध्यमातून टाळ-मृदुंगाच्या गजरात अवयवदानाच्या जनजागृतीसाठी दिंडी काढण्यात आली.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुंबईत ‘अॅपेक्स किडनी फाउंडेशन’ च्या माध्यमातून टाळ-मृदुंगाच्या गजरात अवयवदानाच्या जनजागृतीसाठी दिंडी काढण्यात आली. या दिंडीद्वारे समाजात अवयवदानाचा संदेश देण्यात आला.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसह मुंबईही विठूरायाच्या गजराने न्हाऊन निघाली. शुक्रवारी मुंबईतूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून वडाळ्याच्या प्रती-पंढरपूरमध्ये दिंडी दाखल झाल्या. या दरम्यान लालबाग परिसरातील टाळ-मृदूंगाच्या गजरात अवयवदानाच्या जनजागृतीसाठी दिंडी काढण्यात आली. समाजात अवयवदानाचं महत्त्व निर्माण व्हावं आणि त्यातून अवयवदानाचा संदेश मिळावा यासाठी ही दिंडी काढण्यात आली.

अॅपेक्स किडनी फांऊडेशनतर्फे ही दिंडी काढण्यात आली. समाजात आजही अवयवदानाबाबत तितकीशी जागृती नाही. त्यामुळे अवयवदान किती महत्त्वाचं आहे? हे समजावण्यासाठी या दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. दरवर्षी या दिंडीचं आयोजन करण्यात येतं.

- Advertisement -

समाजात अजूनही अवयवदानाबाबत पुरेशी जनजागृती नाही. त्यामुळे अवयवदानाच्या जनजागृतीसाठी ही दिंडी काढण्यात आली आहे. मागील वर्षीही अवयवदानाचा संदेश देण्यासाठी अशा प्रकारे दिंडी काढली होती. अवयवदानामुळे अनेक गरजूंचे प्राण वाचू शकतात. पण, अवयवदानाचा टक्का खूपच कमी असल्याने अनेक लोक अवयवांच्या प्रतिक्षेत आहे. म्हणून, लोकांमधील गैरसमजूती दूर करणं हा आमचा मुख्य उद्देश आहे. त्यादृष्टीनं आम्ही काम करतोय.
– डॉ. वैशाली बिच्चू, संचालक, अॅपेक्स किडनी फाऊंडेशन

या दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी अवयवदानाच्या माहितीचे बोर्ड घेऊन जागृती करण्याचा प्रयत्न केला. अवयवदान हेच श्रेष्ठदान अशा प्रकारचा संदेश या माध्यमातून देण्यात आले. देशात अवयवदान फार कमी प्रमाणात होतं. १० लाख लोकांच्या मागे केवळ ०.५८ टक्के लोक अवयवदान करतात. अवयव न मिळाल्याने दरवर्षी अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -