घरमनोरंजनअभिनेता टायगर श्रॉफ यंदाच्या मुंबई मॅरेथॉनचा चेहरा

अभिनेता टायगर श्रॉफ यंदाच्या मुंबई मॅरेथॉनचा चेहरा

Subscribe

अभिनेता टायगर श्रॉफ हा यंदाच्या मुंबई मॅरेथॉनचा चेहरा ठरणार आहे.

यंदाच्या मुंबई मॅरेथॉनसाठी अभिनेता टायगर श्रॉफ याची ब्रॅन्डअॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. मुंबई मॅरेथॉनच्या आयोजकांनी टायगर श्रॉफसोबत तसा करार केला आहे. त्यामुळे अभिनेता टायगर श्रॉफ हा यंदाच्या मुंबई मॅरेथॉनचा चेहरा ठरणार आहे. दरम्यान यंदा १९ जानेवारी रोजी मुंबई मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

आशियातील सर्वात प्रतिष्ठेची मॅरेथॉन

मागील १७ वर्षांपासून मुंबई मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा १९ जानेवारी रोजी मुंबई मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. आशियातील सर्वात प्रतिष्ठेची म्हणून या मॅरेथॉनकडे पाहिले जाते. दरवर्षी जवळपास ५० हजारपेक्षा अधिक स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात.

- Advertisement -

…म्हणून केली टायगरची निवड

धावपळीच्या जीवनात तरुणाईला फिटनेसचे महत्व कळावे म्हणून टायगरची निवड करण्यात आली. टायगर श्रॉफच्या फिटनेसमुळे तो सध्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. हेच लक्षात घेऊन यूथ आणि फिटनेस आयकॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टायगर श्रॉफची यंदा मॅरेथॉनचा चेहरा म्हणून निवड करण्या विषयी आयोजकांनी ठरवले.

मागील १७ वर्षांपासून मुंबई मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. धावण्यापलिकडे लोकांना फिटनेस आणि चांगल्या आरोग्याचे महत्व कळावे यासाठी या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. टायगर श्रॉफला मॅरेथॉनचा ब्रॅन्ड अॅम्बेसिडर म्हणून निवडण्यात आल्याने तरुण मोठ्या संख्येने मॅरेथॉनमध्ये सहभागी होतील, अशी आशा आहे.
मुंबई मॅरेथॉनचे आयोजक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -