चक्क पोलीस व्हॅनमध्ये टिकटॉक केला आणि…

पोलिसांच्या व्हॅनमध्ये चक्क टिकटॉक करणे एका तरुणाला आणि एका अल्पवयीन मुलीला चांगलेच महागात पडले आहे.

tiktok video in police van during lockdown kalyan police took action on two
टिकटॉक

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरता देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन व्हावे, म्हणून पोलीस या कठीण प्रसंगात देखील डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. मात्र, काही जणांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे, असाच एक धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये घडला आहे. चक्क पोलिसांच्या व्हॅनमध्ये टिकटॉक केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी दोघांवर धडक कारवाई करण्यात आली आहे.

नेमके काय घडले?

सध्या कल्याण – डोंबिवली कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. विशेष म्हणजे या शहरातील २८ ठिकाणे आहेत, ज्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. दरम्यान, वालधूनी परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या परिसरात पोलीस रस्त्यावर नाकाबंदीमध्ये व्यस्त असताना एका तरुणाने पोलीस व्हॅनमध्ये टिकटॉक व्हिडिओ बनवला. रोहित डांगे असे या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांचे लक्ष नसल्याचे पाहताच रोहित हा पोलीस व्हॅनमध्ये शिरला आणि खाली उतरला, असा त्यांनी टिकटॉक व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ तयार करण्यासाठी त्याला एका अल्पवयीन मुलीने मदत केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, हा टिकटॉक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी दोघांविरोधात कारवाई केली आहे.


हेही वाचा – पैसे भरुनही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बेस्टमध्ये ‘नो एंट्री’