Eco friendly bappa Competition
घर मुंबई परिणामांची चिंता न करता निर्णय घेण्याची वेळ; संजय राऊतांचे पंकजा मुंडेंना आवाहन

परिणामांची चिंता न करता निर्णय घेण्याची वेळ; संजय राऊतांचे पंकजा मुंडेंना आवाहन

Subscribe

मुंबई : पंकजा मुंडे गेल्या काही महिन्यांपासून भारतीय जनता पक्षावर (BJP) नाराज असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून समोर आले आहे. त्यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात पुन्हा एकदा आपली नाराजी जाहीररित्या व्यक्त केली. याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पत्रकार परिषेदत विचारले असता त्यांनी पंकजा मुंडे यांना आवाहन करताना म्हटले की, अन्याय होतो आहे या रडगाण्याला कोणी विचारत नाही, त्यामुळे आता त्यांच्याकडे कोणत्याही परिणामाची चिंता न करता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. (Sanjay Raut’s appeal to Pankaja Munde to make decisions without worrying about the consequences)

संजय राऊत म्हणाले की, पंकजा मुंडे यांना भाजपात कोणी मानत नसल्यामुळेच त्यांनी असे वक्तव्य केले असावे. त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांनी भाजप पक्षासाठी रक्ताचे पाणी केले. भाऊसाहेब फुंडकर यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी शुन्यातून भाजप निर्माण केला. मात्र, आज मुंडे परिवाराची राजकारणात वाताहत केली जात आहे. यासाठी दिल्ली व महाराष्ट्रात मोठ्या हालचाली सुरू आहेत. पंकजा मुंडे यांचा गेल्या निवडणुकीत पराभव का व कसा झाला?, हे सांगण्याची आता गरज नाही. भाजप परिवारातच आता मुंडे परिवाराविरोधात राजकारण सुरू आहे. काहीही असले तरी आमची मुंडे परिवाराविषयी आस्था कायम राहील.

- Advertisement -

हेही वाचा – गजानन कीर्तिकरांनी त्यांचं स्टेटमेंट पुन्हा एकदा जाहीरपणे ऐकावे; संजय राऊतांचा सल्ला

गोपीनाथ मुंडे असते तर चित्र वेगळे असते
संजय राऊत म्हणाले की, गोपीनाथ मुंडेंमुळे आम्हाला मुंडे परिवाराविषयी कायम आस्था आणि प्रेम राहीले आहे. ते असते, तर शिवसेना-भाजपा युतीला आज वेगळी दिशा मिळाली असती आणि कदाचित वेगळे चित्र दिसले असते. अन्याय होतो आहे या रडगाण्याला आता कोणी विचारत नाही, त्यामुळे त्यांच्याकडे कोणत्याही परिणामाची चिंता न करता निर्णय घेण्याची वेळ आली आहे.

- Advertisement -

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
राष्ट्रीय समाज पक्षाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकर यांच्या जयंती निमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, लोक मला म्हणतात ताईचा पक्ष ताईचा पक्ष, पण माझीा कुठला पक्ष? मी भारतीय जनता पक्षाची आहे. पण पक्ष माझा थोडीच आहे. भाजपा खूप मोठा पक्ष आहे. मी भाजपाची होऊ शकते. पण पक्ष माझा होऊ शकत नाही. कारण पक्ष खूप मोठा आहे.

 

- Advertisment -