घरताज्या घडामोडी'यात्रीगण कृपया ध्यान दे', मध्य रेल्वेच्या उद्घोषकांवर आली उपाशी राहण्याची वेळ!

‘यात्रीगण कृपया ध्यान दे’, मध्य रेल्वेच्या उद्घोषकांवर आली उपाशी राहण्याची वेळ!

Subscribe

भारतीय रेल्वेत खासगीकरणाचा सपाटा लावला असून त्याचा फटका खासगी कंत्राटदार कामगारांना बसत आहे. टाळेबंदीच्या काळात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कंत्राटी पद्धतीवर असलेल्या शेकडो रेल्वे उद्घोषकांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर त्यांना कायमस्वरुपी नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये लूटत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता रेल्वेच्या मराठी उद्घोषकांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे.

 चार महिन्यापासून वेतन नाही 

भारतीय रेल्वेत रेल्वे स्थानकांवर उद्घोषकांसाठी पूर्वीपासून रेल्वेच्या विविध विभागांतून उद्घोषकांसाठी निवड होत होती. या पदावर बढती किंवा इतर वाढीची शक्यता नसल्यामुळे अनेक रेल्वे कर्मचारी या पदाकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे अनेक स्थानकांवर उद्घोषकांची कमतरता जाणवत होती. सर्वाधिक कमतरता मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात जाणवत होती. कारण मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात उपनगरीय रेल्वे स्थानकांवर रात्री १० वाजल्यानंतर इंडिकेटर बंद होणे किंवा लोकलची उद्घोषणा न होणे, यामुळे प्रवाशांची रेल्वे स्थानकात मोठी गैरसोय होत होती. २०१६ पासून मध्य रेल्वेने खासगी उद्घोषकांची नेमणूक करण्याची सुरुवात केली. यासाठी दोन वर्षांच्या करारावर खासगी कंपनीला कंत्राट देण्यात येत आहे.

- Advertisement -

शंभर पेक्षा जास्त उद्घोषक

जवळ जवळ ३५ पेक्षा जास्त रेल्वे स्थानकांवर कंत्राटी उद्घोषकांची नेमणूक केली आहे. सध्या मुंबई आणि उपनगरातील शंभर पेक्षा जास्त मुले मुली या रेल्वे स्थानकावर कंत्राटी उद्घोषक म्हणून काम करतात. यामध्ये सर्वाधिक मराठी मुला मुलींचा समावेश आहे. आगोदरच तुटपुंज्या पगारात काम करणार्‍या या कंत्राटी उद्घोषकांना कोरोना काळातील चार महिन्यांचे वेतन थकीत आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. यासंबंधी कंत्राटदाराची तक्रार केल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी सुद्धा कामगारांना दिली जात असल्याचा आरोप दैनिक आपलं महानगरशी बोलताना कंत्राटी उद्घोषकांनी केला आहे. यासंबंधी दैनिक आपलं महानगरने कंत्राटदारांशी संपर्क केला असता आमचा संपर्क होऊ शकला नाहीत.

रेल्वे ही सर्व करारांचे तंतोतंत पालन करते. आमच्याकडे कुठल्याही कॉन्ट्रॅक्टची बिल थकबाकी नाही. सर्व पेमेंट वेळेत दिली जातात.
– शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी,मध्य रेल्वे

 

कंत्राटी पद्धतीवर नियुक्त केलेल्या रेल्वेच्या उद्घोषकांना कंत्राटदाराने तत्काळ थकीत वेतन देण्यात यावेत. तसेच कंत्राटदारांवर रेल्वे प्रशासनाकडून वचक ठेवण्यात यावा. अन्यथा रेल्वेने पूर्ण कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या कामगारांची जबाबदारी घ्यावी. त्यांना वेतन देण्यात यावे.

-अमिती भटनागर, महामंत्री, सेट्रल रेल्वे कॉन्ट्रॅक्ट लेबर संघ
- Advertisement -

कंत्राट रद्द करा

एस अ‍ॅण्ड एस ऑऊट सोर्सिंग नावाच्या कंपनीला रेल्वेमध्ये अनाऊन्सर इंडिकेटर ऑपरेटरचे कंत्राट दिले आहे. ही कंपनी जुन्या मुलांना विनाकारण काही चूक नसताना कामावरून काढून टाकत आहे. तसेच कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या मराठी मुलांना खोटी आश्वासने दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम कंत्राटदार करत असल्याचा आरोपही कंत्राटी उद्घोषकांनी दैनिक आपलं महानगरशी बोलताना केला आहे.तसेच रेल्वे प्रशासनाने या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून त्यांचे रेल्वेतील उद्घोषणेचे कंत्राट तत्काळ रद्द करण्याची मागणीही केली आहे.


हे ही वाचा – घ्या आता रियावर चित्रपट, मुंबईत शुटींगलाही झाली सुरूवात!


Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -