Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई संघाच्या माध्यमातून देशाला...; कुरुलकरांच्या अटकनंतर नाना पटोलेंचा गंभीर आरोप

संघाच्या माध्यमातून देशाला…; कुरुलकरांच्या अटकनंतर नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Subscribe

मुंबई : पाकिस्तानी गुप्तहेरांच्या हनी ट्रॅपमध्ये अडकून गोपनीय माहिती दिल्याप्रकरणात डॉ. प्रदीप कुरुलकर यांना अटक करण्यात आली आहे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) कार्यकर्ते आहेत. कुरुळकर यांच्या चार पिढ्यानी संघासोबत काम केले. असे असतानाही संघ त्यावर बोलायला तयार नाही, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

कुरुलकर यांच्या अटकेवर बोलताना नाना पटोले यांनी आरोप केला की, प्रदीप कुरुलकर संघाचे कार्यकर्ते होते. त्यांनी देशांची माहिती पाकिस्तानला दिली. म्हणजे संघाच्या माध्यमातून देशाला नुकसान पोहचवण्याचे काम सुरू होते, असा अर्थ आपण लावू शकतो. कुरुलकरांच्या अटकेनंतर संघ काही बोलण्यास तयार नाही आणि आमचा काही संबंध नाही, असे म्हणत संघाने हात काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे प्रदीप कुरुलकर सांगत आहेत माझ्या चार पिढ्या संघात आहेत. त्यामुळे कोण खरे बोलतो कोण नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी संघाच्याच एका पदाधिकाऱ्याने भाजपाच्या आमदारांना मंत्रीपदाचं आमिष दाखवले. यात संघाचा नेमका उद्देश काय? हे सांगता येत नाही. पण आतापर्यंत संघाबद्दल आम्ही जे ऐकून होतो त्याच्या उलट गेल्या काही दिवसांपासून संघाची प्रतिमा पाहायला मिळत आहे. यावर संघानेच बोलणे गरजेचे आहे. कारण संघाचेच लोकं संघाची बदनामी करत आहेत आणि  हे दुर्भाग्य आहे, अशी टिप्पणी पटोले यांनी केली.

पटोले म्हणाले की, संघावर प्रतिक्रिया देणे मला पटत नाही, कारण संघ खूप विद्वान आणि वैचारिक लोकांची संघटना आहे. पण संघाच्या माध्यामातून मोठे झालेले लोक जर असे वागत असतील आणि त्यातून समाजासमोर चुकीचे चित्र उभे राहत असेल, तर ते फार भयानक आहे, असा टोलाही पटोलेंनी लगावला.

- Advertisement -

hooney trapped प्रकरणी डॉ. प्रदीप कुरुलकर यांना अटक
पुण्यातील डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर पाकिस्तान गुप्तचर संस्थेतील एका महिलेच्या संपर्कात देखील होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्यांनी व्हॉट्सअप मेसेज, व्हॉट्सअप कॉलिंग आणि व्हॉट्सअपच्या व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना माहिती पुरवली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून डीआरडीओच्या दक्षता विभागाकडून आणि गुप्तचर पथकांकडून डॉ. कुरूलकर यांच्यावर नजर ठेवून होते. अखेरीस याबाबतची संपूर्ण माहिती पुराव्यानिशी मिळाल्यानंतर आणि DRDO मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर ATSने अधिकृत गुप्त कायद्यांतर्गत आरोपी डॉ. कुरूलकर यांना अटक केली.

- Advertisment -