घरताज्या घडामोडीPetrol Diesel Price: सात दिवसांनी पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर! आज कोणतीही दरवाढ...

Petrol Diesel Price: सात दिवसांनी पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर! आज कोणतीही दरवाढ नाही

Subscribe

मागील सात दिवस देशातील पेट्रोल डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढल्या होत्या. दरदिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत ३५ पैशांनी वाढ होत होती.

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतींना आज आराम मिळाला आहे. आज तब्बल सात दिवसांनी पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. मागील सात दिवस देशातील पेट्रोल डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढल्या होत्या. दरदिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत ३५ पैशांनी वाढ होत होती. ऑक्टोबर महिन्यात देशातील इंधनांच्या किंमतींमध्ये जवळपास २४- २५ वेळा वाढ झाली. या काळात पेट्रोल डिझेल तब्बल ८ रुपयांनी महाग झाले. २४ सप्टेंबरपासून या किंमती दररोज वाढत आहेत. आज या किंमतीत कोणतीही वाढ न झाल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जाणून घ्या देशातील प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलच्या किंमती.

मुंबईत आज एक लीटर पेट्रोलचे दर ११५.८५ रुपये आहेत. तर डिझेलसाठी १०६.६२ रुपये मोजावे लागत आहेत. मुंबईत डिझेलच्या किंमती फार झपाट्याने वाढत आहेत. तुलनेत राजधानी दिल्लीत डिझेलच्या किंमती शंभरच्या आतच आहेत. दिल्लीत सध्या एक लीटर डिझेलसाठी ९८.४२ तर एक लीटर पेट्रोलसाठी ११०.०४ रुपये मोजावे लागत आहेत.

- Advertisement -

मुंबई

पेट्रोल – ११५.८५ रुपये प्रति लीटर
डिझेल – १०६.६२ रुपये प्रति लीटर

- Advertisement -

दिल्ली

पेट्रोल – ११०.०४ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९८.४२ रुपये प्रति लीटर

चेन्नई

पेट्रोल – १०६.६६ रुपये प्रति लीटर
डिझेल – १०२.५९ रुपये प्रति लीटर

बंगळूरू

पेट्रोल – ११३.९३ रुपये प्रति लीटर
डिझेल – १०४.५० रुपये प्रति लीटर

चंदीगड

पेट्रोल – १०५.९४ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९८.१६ रुपये प्रति लीटर

बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजाराक तेल मानक ब्रेंट क्रूड ०.१५ टक्क्यांनी वाढून ८४.८४ डॉलर प्रति बॅलरच्या भावात पोहचले आहे. त्याचप्रमाणे फॉर्वल्ड ट्रेडिंगमध्ये देखील घसरण पहायला मिळाली. तर कच्च्या तेलांच्या किंमतीत १५ रुपयांनी घरसण होऊन ६ हजार २७८ रुपये प्रति बॅलर झाले आहे.


हेही वाचा – gold price dhanteras : धनत्रयोदशीला यंदा सोन्यात ८३०० रुपयांची घसरण, जाणून घ्या आजचे दर

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -