Vaccination for women: मुंबईत आज महिलांसाठी लसीकरण, थेट केंद्रावर मिळणार मोफत लस

सकाळी १०:३० ते संध्याकाळी ६:३० वाजेपर्यंत महिलांना थेट लसीकरण केंद्रावर जाऊन मोफत लसीकरण करता येणार

Today Special vaccination for women,get free vaccines bmc vaccination center in Mumbai
Vaccination for women: मुंबईत आज थेट लसीकरण केंद्रावर जाऊन महिलांना घेता येणार मोफत लस

मुंबईत सुरू झालेल्या महिलांच्या स्पेशल लसीकरण मोहिमेला (Vaccination for women) माहिलांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मुंबईत आज पुन्हा एकदा महिलांसाठी खास मोफत लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. मुंबईतील पालिका तसेच शासकीय लसीकरण केंद्रावर सकाळी १०:३० ते संध्याकाळी ६:३० वाजेपर्यंत महिलांना थेट लसीकरण केंद्रावर जाऊन मोफत लसीकरण करता येणार आहे. आज लसीकरणासाठी कोणत्याही प्री बुकींगची गरज नाही. थेट लसीकरण केंद्रावर लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेता येणार आहे.

पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या लसीकरण मोहिमेलाही वेग यावा महिलांमध्ये लसीकरणाचे प्रमाण वाढावे यासाठी मुंबई पालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत याआधी दोन वेळा महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती. आज महिलांसाठी तिसरी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे.

मुंबई पालिकेच्या एकूण ३२८ लसीकरण केंद्रावर महिलांना थेट जाऊन लस घेता येणार आहे. त्यामुळे मुंबईत आज ऑनलाईन लसीकरण नोंदणी पूर्णपणे बंद राहणार आहेत. मुंबईत आतापर्यंत लसीकरणाची संख्या पाहता मुंबईत आतापर्यंत ८५ टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे तर ४५ टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

१७ सप्टेंबर महिलांसाठीची पहिली विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती त्या मोहीमेला मुंबईतील महिलांनी चांगला प्रतिसाद देत मुंबईतील एकूण पालिका आणि सरकारी केंद्रावर १ लाख ७ हजार महिलांचे लसीकरण पार पडले होते. त्यानंतर २७ सप्टेंबरला महिलांसाठीचे दुसरी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती.


हेही वाचा – Petrol Diesel Price: सलग चौथ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या, पहा आजचे दर