घरदेश-विदेशआज ते एका धर्मासाठी बोलले, उद्या ते...; रमेश बिधुरींच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आदित्य...

आज ते एका धर्मासाठी बोलले, उद्या ते…; रमेश बिधुरींच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आदित्य ठाकरेंची बोचरी टीका

Subscribe

भाजपा खासदार रमेश बिधुरी यांनी संसदेतील चर्चेदरम्यान बहुजन समाज पक्षाचे (BSP) खासदार दानिश अली यांच्या विरोधात असंसदीय भाषा वापरल्याबद्दल वाद चांगलाच चिघळला आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रमेश बिधुरी यांच्या वक्तव्याबद्दल लोकसभेत माफी मागावी लागली आहे. भाजपानेही बिधुरी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच विधान लोकसभेच्या कामकाजाच्या रेकॉर्डमधून रमेश बिधुरी यांचे वक्तव्य हटवण्यात आले आहे. परंतु बिधुरी यांच्या वक्तव्यानंतर विरोधक सरकारला लक्ष्य करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही ट्वीट करत भाजपावर सडकून टीका केली आहे. (Today they spoke for a religion tomorrow they After Ramesh Bidhuris controversial statement Aditya Thackerays criticism)

आदित्य ठाकरे ट्वीट करताना म्हणाले की, आपल्या लोकशाहीच्या मंदिरात एखाद्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार्‍या व्यक्तीला अशा घाणेरड्या वर्तनासाठी केवळ इशारा दिला जातो, ही खरोखरच लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकारच्या विरोधात बोलणारा विरोधी सदस्य असता तर त्या सदस्याला निलंबित केले असते आणि बरेच काही केले असते, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आदित्य ठाकरेंच्या उंचीवरून आरोप-प्रत्यारोप; रामदास कदमांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणतात…

रमेश बिधुरी यांच्यावर वक्तव्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, सत्य हे आहे की, हे फक्त भाषेबद्दल नाही, ही वृत्ती आहे. आज ते एका धर्मासाठी बोलले आहेत, उद्या ते कोणत्याही राजकीय विरोधकांसाठी बोलतील. ते आमच्या देशासाठी किंवा माझ्या धर्मासाठी बोलत नाहीत, ते त्यांच्या राजकीय मानसिकतेसाठी बोलत आहेत, अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

- Advertisement -

बिधुरी यांनी माफी मागावी – जितेंद्र आव्हाड

दरम्यान, रमेश बिधुरी यांनी माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. ते म्हणाले की, आतापर्यंत लोकसभेत सुसंस्कृत मुल्यांचे प्रदर्शन व्हायचे. पण, बोलताना तारतम्य बाळगले जायचे. कधी कोणी असंसदीय शब्द वापरला तर माफी मागितली जायची. पण, या विशेष अधिवेशनाला कलंकित करणारा प्रकार काल भाजपचे दिल्लीतील खासदार रमेश बिधुरी यांनी केला आहे. त्यांनी आपल्या भाषणात खासदार दानीश अली यांना उद्देशून आक्षेपार्ह शब्द वापरले. त्यावेळेस भाजपाचे ज्येष्ठ खासदार रविशंकर प्रसाद हसत होते. असे शब्द लोकसभेत वापरले जाऊच शकत नाहीत. आता प्रश्न असा आहे की, एखाद्या समाजाचे, धर्माचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसाला त्याच्या धर्माच्या- जातीच्या नावावरून शिव्या देणे ही भारताची संस्कृती आहे का? या प्रकाराने जगभरात देशातील असे चित्र उभे राहिले की, आपल्या देशात विशिष्ट समाजाला आपण किती अवमानित करीत असतो. याचे आंतरराष्ट्रीय परिणाम आपणाला भोगावे लागणार आहेत. तुम्ही धर्मद्वेष किती वाढवत आहात, हे सबंध देशाने पाहिले आहे. म्हणूनच इंडियाची मागणी आहे की भाजपने देशाची आणि ज्या समाजाचा अपमान केला आहे. त्यांनी माफी मागावी अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

हेही वाचा – Narendra Modi : पंतप्रधानांनी फॅमिली प्रायव्हेट पार्टी म्हटलेल्या पक्षाने एनडीएसोबत केली युती

काय आहे प्रकरण?

संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी भाजपा खासदार रमेश बिधुरी लोकसभेमध्ये चांद्रयान-3 च्या यशावर बोलत असताना बीएसपी पक्षाचे खासदार दानिश अली यांनी टिप्पणी केल्यानंतर बिधुरी संतप्त झाले आणि त्यांनी लोकसभेमध्ये दानिश अली यांच्याविरोधात वादग्रस्त शब्दांचा वापर केला. त्यामुळे विरोधक चांगलेच संतप्त झाले आहे. सध्या लोकसभेच्या कामकाजातून रमेश बिधुरी यांच्या वक्तव्यातील वादग्रस्त भाग हटवण्यात आला आहे. तसेच लोकसभा अध्यक्षांकडे रमेश बिधूडी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -