घरमुंबईआजची मुंबई 'डब्याविना'

आजची मुंबई ‘डब्याविना’

Subscribe

आज सकाळी अंधेरी स्टेशनवर पडलेल्या पुलामुळं डब्बेवाल्यांची सगळीच सेवा अचानक कोलमडली. दोन दिवस सतत कोसळणारा पाऊस आणि मुंबईची लाईफलाईन ढासळल्याचा फटका आज डब्बेवाल्यांनादेखील बसला आहे. त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी

‘मुंबईचे डब्बेवाले’ ही अर्थात मुंबईची शान आहे. लाखो लोकांची भूक रोज हे डब्बेवाले अगदी वेळेवर डबा देऊन मिटवतात. रेल्वेतून रोज मुंबईच्या वेगवेगळ्या भागात हे डब्बेवाले डबा पोहचवत असतात. या डब्ब्यांवर अनेकांचं दुपारचं जेवण अवलंबून असतं. मात्र, आज सकाळी अंधेरी स्टेशनवर पडलेल्या पुलामुळं ही सगळीच सेवा अचानक कोलमडली. त्यामुळं आज मुंबई ‘डब्याविना’ उपाशी राहिली आहे. दोन दिवस सततचा पाऊस आणि त्यात आज मुंबईची लाईफलाईन अर्थात रेल्वे कोलमडल्यामुळं बऱ्याच लोकांना आज डबे पोचू शकले नाहीत.

आज सर्व्हिस बंद

दोन दिवस सतत कोसळणारा पाऊस आणि मुंबईची लाईफलाईन ढासळल्याचा फटका आज डब्बेवाल्यांनादेखील बसला आहे. पाणी भरल्यामुळं आज अंधेरीचा गोखले पूल कोसळला. पश्चिम रेल्वेची सेवा संपूर्णतः कोलमडली. त्यामुळं संपूर्ण मुंबईचे हाल झाले. पण सर्वात जास्त त्या लोकांचे हाल झाले, जे टिफिन सर्विसवर अवलंबून असतात. ही सेवा ठप्प झाल्यामुळं आज मुंबईच्या डब्बावाल्यांनादेखील आपली सेवा देता आलेली नाही.

- Advertisement -

रोज २ लाख डब्ब्यांची होते डिलिव्हरी

मुंबईचे डब्बेवाले हा आता एक ब्रँडच बनला आहे. योग्य वेळात उत्कृष्ट डिलिव्हरी ही याची खासियत आहे. पण ही सेवा संपूर्णतः रेल्वेवर अवलंबून असते. घरातलं जेवण वेळेवर नेऊन द्यायचं काम हे डब्बेवाले करतात. पूर्ण मुंबईमध्ये ही सर्व्हिस असून साधारणतः ५००० लोक रोज २ लाखापेक्षा अधिक टिफीनची डिलिव्हरी करतात.

या क्षेत्रात होते ४०-४५ कोटींची उलाढाल

डब्बेवाल्यांची ही सेवा साधारण १२५ वर्षांपूर्वी सुरु झाली होती. आता सध्या ४० ते ४५ कोटींची उलाढाल या क्षेत्रात होते. एका अंदाजानुसार, एका बॉक्सचा मासिक खर्च हा ४५० रुपये आहे. तर हॉर्वर्ड बिझनेस स्कूल ही अशी एकच जागा आहे, जिथे डब्बेवाल्यांबाबत अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासातून डब्बेवाल्यांचा व्यवस्थापनात फारच कमी कमतरता असल्याचं समोर आलं आहे. साधारण ६० लाख डब्ब्यांमध्ये एखादाच कमी असण्याची शक्यता असते असंही या समोर आलं आहे.

- Advertisement -

एका दिवसात किती होतं नुकसान?

एका अहवालानुसार, जर डब्बेवाल्यांची सेवा मुंबईत एक दिवस बंद असेल तर साधारण २ लाख लोकांवर याचा परिणाम होतो. ३ जुलैला अंधेरीत पुलाच्या कोसळल्यानं टिफिन सेवा केवळ पश्चिम रेल्वे लाईनवर बंद झाली. मात्र, पूर्ण मुंबईत डब्बा बंद असल्यास, ३० लाखाचं नुकसान होतं. ही रक्कम डब्बेवाल्यांच्या दृष्टीनं खूप मोठी आहे.

मुंबई डब्बेवाल्यांबद्दल खास गोष्टी

– १८९० मध्ये मुंबई डब्बेवाला सेवेची सुरुवात
– २ लाख लोकांना दिली जाते सेवा
– घरापासून ३ तासांत ऑफिसमध्ये पाठवला जातो डबा
– रोज ६० ते ७० किलोमीटरपर्यंत केला जातो प्रवास
– रोज डबा नेण्यासाठी साधारण ४५० – ६०० रुपयांचा होतो खर्च
– डबा देण्यासाठी सायकल आणि मुंबईच्या रेल्वेचा मोठ्या प्रमाणावर केला जातो उपयोग
– काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना ९ ते १० हजार रुपये पगार
– वर्षातून एका महिन्यात अतिरिक्त बोनस मिळतो
– नियम तोडल्यास लागतो एक हजार रुपयांचा दंड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -