Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Tops security प्रकरणी आर.ए. राजीव यांना ईडीचे समन्स

Tops security प्रकरणी आर.ए. राजीव यांना ईडीचे समन्स

Related Story

- Advertisement -

टॉप्स सिक्युरिटी (Tops Security) प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक व त्यांच्या पुत्रांच्या चौकशीनंतर ईडीने मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) आयुक्त आर.ए. राजीव यांना समन्स बजावले आहे. यामुळे राजीव यांना ईडीसमोर हजर राहावे लागणार असून त्यांच्या चौकशीतून आणखी काही बड्या धेंडांची नावे बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात ईडीने आतापर्यंत दोन जणांना अटक केली आहे. यामध्ये प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार अमित चांदोळे यांचा समावेश आहे. दरम्यान,उद्या मंगळवारी दुपारी १२ वाजता आर.ए. राजीव ईडी समोर हजर राहणार आहेत.

डिंसेबर महिन्यात ईडीकडून सरनाईक यांची चौकशी करण्यात आली होती. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. पण आता
आर.ए. राजीव यांना ईडीने समन्स बजावल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

- Advertisement -

टॉप्स सिक्युरिटी आणि एमएमआरडीए मध्ये जे कंत्राट झाले होते ते तत्कालिन आयुक्त यु पी एस मदान यांच्या कार्यकाळातील होते. मात्र मदान निवृत्त झाल्याने आता विद्यमान आयुक्त असलेल्या आर ए राजीव यांची या दरम्यानच्या काळात झालेल्या सिक्युरिटी गार्डच्या नियुक्तीबाबत ईडी चौकशी करणार आहे.

नेमके प्रकरण आहे तरी काय ?

टॉप्स सिक्युरिटी ही राहुल नंदा यांची कंपनी आहे. सरकारी व खासगी कंपन्यांना सिक्युरिटी गार्ड पुरवण्याचे काम ही कंपनी करते. टॉप्स ग्रुपने १७५ कोटींचे कंत्राट मिळवण्यासाठी MMRDA ला ७ कोटींची लाच दिली होती. अशी तक्रार टॉप्स सिक्युरिटीचे माजी कर्मचारी रमेश अय्यर यांनी मुंबई पोलिसांकडे केली. या तक्रारीनुसार टॉप्स सिक्युरिटीकडून १०० पैकी फक्त ७० टक्के गार्ड्स प्रत्यक्षात काम करत होते. ३० टक्के गार्ड्स फक्त कागदावर दाखवले जात होते. म्हणजेच जवळपास5 १५० हून अधिक गार्डस कामावर असल्याचे दाखवत MMRDAकडून पैसे उकळले जात होते. ही रक्कम टॉप्सच्या ग्रुपला मिळत होती. त्यातील रकमेचा काही भाग अमित चांदोळे आणि संकेत मोरे यांना मिळत असल्याचीही माहिती ईडीच्या तपासात समोर आली.

- Advertisement -