घरमुंबईतोरडमल यांचे योगदान अमूल्य! - सावरकर

तोरडमल यांचे योगदान अमूल्य! – सावरकर

Subscribe

माझी मुलगी लहान असताना गुडबाय डॉक्टर या नाटकात एक लहानशी भूमिका करायची. तिची भूमिका पाहून तोरडमल यांनी एक मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, तिला नैसर्गिक अभिनय करू देत. जास्त सूचना नको देऊ. तिच्यातील बालकलाकार फुलू देत. त्यांना नटांची पारख होती. तोरडमल यांचं रंगभूमीवरचं योगदान मोलाचं होतं.

प्रसिद्ध लेखक,नाटककार,दिग्दर्शक,नाट्य निर्माते आणि रंगकर्मी कै.मधुकर तोरडमल यांची ८४ वी जयंती गिरगाव येथील मुंबई मराठी साहित्य संघाच्या डॉ. पुरंदरे सभागृहात मंगळवारी २४ जुलै साजरी करण्यात आली. या जयंती निमित्ताने दिवंगत ज्येष्ठ रंगकर्मी नेताजी भोईर यांना मधुकर तोरडमल स्मृती चतुरस्त्र रंगकर्मी पुरस्कार (मरणोत्तर) देण्यात आला.अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष जयंत सावरकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या वेळी जेष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, प्रदिप कबरे, तृप्ती तोरडमल, रमेश भाटकर, उपेंद्र दाते, शर्मिला तोरडमल, संयुक्ता तोरडमल आदी मान्यवर उपस्थित होते. पाच हजार रुपये रोख, शाल-श्रीफळ व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते. नेताजी भोईर यांच्या कन्या सुनंदा रायते आणि मुलगा सुरेश भोईर यांनी या पुरस्काराचा स्वीकार केला.

यावेळी सावरकर म्हणाले, माझी मुलगी लहान असताना गुडबाय डॉक्टर या नाटकात एक लहानशी भूमिका करायची. तिची भूमिका पाहून तोरडमल यांनी एक मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, तिला नैसर्गिक अभिनय करू देत. जास्त सूचना नको देऊ. तिच्यातील बालकलाकार फुलू देत. त्यांना नटांची पारख होती. तोरडमल यांचं रंगभूमीवरचं योगदान मोलाचं होतं.

- Advertisement -

पुरस्कार देण्याच्या वेळी उपेंद्र दाते यांनी कै. नेताजी भोईर यांची ५० वर्षांची कारकीर्द उलगडून दाखवली. सोबतच तोरडमल यांच्याविषयीच्या आठवणींना देखील उजाळा दिला. ‘प्रा. कै तोरडमल आणि माझे नाते अगदी काका-पुतण्यासारखे होते. त्यांच्यासोबत मीदेखील काही नाटकं केलीत. त्यांच्या शेवटच्या काळात मी सोबत होतो. आजारपणात मी वाचून दाखवलेली नाटके ऐकताना ते रमून जायचे. माझी ते अगदी चातकासारखी वाट बघायचे. आम्हाला त्यांची उणीव सतत भासेल.’

नाट्य कलाकार संघ,रंगमंच मुंबई,अमेय आणि तोरडमल कुटुंबीय यांच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात तोरडमल यांच्यातिसरी घंटाया मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या आत्मचरित्राच्या तिसर्‍या आवृतीचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी तोरडमल यांच्या क्रांती,ऋणानुबंध,झुंज,मगरमिठी,गुडबाय डॉक्टर,समज-गैरसमज,बाप बिलंदर बेटा कलंदर, काळंबेटलाल बत्ती या आठ नाटकांतील निवडक प्रवेशांचे साभिनय वाचन करण्यात आले.

- Advertisement -
sharmila toradmal
शर्मिला तोरडमल

शर्मिला तोरडमल- (ज्येष्ठ कन्या)
पप्पांना जाऊन एक वर्ष झाले तरीसुध्दा ते आमच्यातच आहे असे वाटते.आमच्या शिक्षणासाठी ते खूप आग्रही होते.त्यांनी आम्हाला नेहमीच लाईमलाईट पासून दूर ठेवले.त्यांनी संपूर्ण आयुष्य हे साहित्याला वाहिले होते.शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी वाचन सोडले नाही.ते आम्हाला सतत समाजकार्यासाठी प्रोत्साहन देत.त्यांच्या प्रोत्साहनामुळेच आज मी व माझ्या पतीने जवळपास बारा गावं दत्तक घेतलीत.

 

 

truti toradmal
तृप्ती तोरडमल

 

तृप्ती तोरडमल(मुलगी-अभिनेत्री)
पप्पांची मी सर्वात लाडाची,त्यांच्या प्रेरणेनेच मी अभिनय क्षेत्रात उतरले. माझ्या ‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपटाचे चित्रिकरण नुकतेच संपले होते आणि त्यांच्या शेवटच्या काळात त्यांनी माझा चित्रपट बघण्याची इच्छा बोलून दाखवली होती.पण चित्रपट प्रदर्शित व्हायला भरपूर वेळ होता. मग मी जॉन अब्राहमशी बोलून त्यांना माझ्या चित्रपटाचा रफ कट दाखवला होता. त्यांची तब्येत बरी नसताना देखील त्यांनी संपूर्ण चित्रपट उत्साहाने बघितला होता. त्यानंतर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया माझ्या कायम स्मरणात राहील. त्यांना बोलताही येत नव्हते तरी त्यांनी मला हातांच्या खुणांनी प्रतिक्रिया दिली होती. माझा पदार्पणाचा चित्रपट हा त्यांनी पाहिलेला सर्वात शेवटचा चित्रपट होता. त्यांनी दिलेली प्रतिक्रिया ही माझ्यासाठी खूप खास होती. माझ्या चित्रपटाचे रिलिज आणि त्यांना जाऊन होणारे एक वर्ष हा अगदी चांगला योग जुळून आलाय. पप्पांचा आशिर्वादच म्हणता येईल!

vandana gupte
वंदना गुप्ते – अभिनेत्री

 

वंदना गुप्ते-अभिनेत्री
माझ्या आयुष्यातील पहिला हिरो कोण असेल तर ते प्रा.मधुकर तोरडमलच!माणूस म्हणून खूप प्रेमळ व्यक्तिमत्व. मात्र,कामाच्या बाबतीत खूप कडक होते. नाटकातील पात्र हवे तसे परफेक्ट होईपर्यंत ते सर्वांकडूनच खूप मेहनत करवून घ्यायचे. गाठ माझ्याशी’ हे मी त्यांच्यासोबत केलेलं पहिलं नाटक. त्यानंतरही मी त्याच्यासोबत गगनभेदी आणि झुंज ही नाटकं केली. मी त्यांच्यासोबत नाटकांचे जवळपास २००० प्रयोग केलेत. त्यांची प्रत्येक नाटकं ही समाजाला प्रतिबिंबित करणारी असायची. माणसांच्या स्वभावावरुन लिहिलेली नाटकं असायची. आजही त्यांच्या नाटकांचे पुनर्लेखन होते आहे. त्यांच्यासारखा रंगकर्मी होणे नाही!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -