Homeक्राइमTorres Scam : आरोपींकडून बनावट ओळखपत्रांचा वापर; टोरेस घोटाळ्यातील रियाजची माहिती

Torres Scam : आरोपींकडून बनावट ओळखपत्रांचा वापर; टोरेस घोटाळ्यातील रियाजची माहिती

Subscribe

दादरच्या शिवाजी पार्क परिसरात असलेल्या टोरेस कंपनीनी हजारो कोटीं रुपयांचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले. या घोटाळ्यातील अनेकांनी आपली कमाई गमावली असून, आर्थिक संकटासा सामोरं जावं लागतं आहे. अशात, या घोटाळ्यासंदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क परिसरात असलेल्या टोरेस कंपनीनी हजारो कोटीं रुपयांचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले. या घोटाळ्यातील अनेकांनी आपली कमाई गमावली असून, आर्थिक संकटास सामोरं जावं लागतं आहे. अशात, या घोटाळ्यासंदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या घोटाळ्यात फरार असलेल्या तौसिफ रियाज यानेच ही माहिती शिवाजी पार्क पोलिसांना पुरवल्याचे समजते. या घोटाळ्याची माहिती मिळाली तेव्हा संबंधित यंत्रणांना माहिती आणि पुरावे 4 जानेवारीलाच दिले, अशी माहिती त्याने दिली असून, ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आणि आगामी काळातील आर्थिक नुकसान टाळण्यासाठी इन्कम टॅक्स, वित्तीय आणि दुसऱ्या यंत्रणांकडे तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली आहे. (torres scam wanted accused tausif riyaz alerted agencies about companies economic offences)

टोरेस घोटाळ्यातील फरार तौसिफ रियाज याने केलेल्या दाव्यानुसार, टोरेस ज्वेलरी बिझनेसच्या आडून पाँझी योजना राबवते. ज्यामध्ये कर चोरी, अतिरिक्त खर्च आणि मनी लाँडरिंग सारख्या गैर प्रकाराचा समावेश होता, असा दावा तौसिफ रियाज याने यंत्रणांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. हे पत्र कंपनीचे संचालक आणि शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केलेल्या सर्वेश सुर्वेनं लिहिलं आहे. हेच पत्र सर्वेश सुर्वे याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही ही लिहिल्याचा दावा तौसिफने केला आहे.

टोरेस स्कॅम B2B ज्वेलरी यूक्रेन आणि कैनकी ज्लेवरी (तुर्की) स्कॅमच्या योजनेच्या स्ट्रक्चरप्रमाणे लोकांकडून चालवलं जात होतं. विशेष म्हणजे तौसिफ रियाजनं या प्रकरणाची माहिती यंत्रणाकंडे दिल्याची माहिती आहे. हे प्रकरण उघडकीस आणण्याचा सातत्यानं प्रयत्न केला असल्यानं त्याच्या जिवाला धोका असल्याचा दावा तौसिफ रियाजनं केला.

दरम्यान, मुंबईतील शिवाजी पार्क पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. 2019 मधील यूक्रेन आणि रशियातील B2B ज्वेलरी घोटाळ्यात असणाऱ्या लोकांनी टोरेस फसवणूक रॅकेट चालवल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, मुंबई, नवी मुंबई, मीरा रोड, सानपाडा येथील लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक टोरेस घोटाळ्यात झाली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला आहे. आर्थिक गुन्हे शाखा देखील या अहवालातील दाव्यांची तपासणी करत आहे.

याशिवाय, “टोरेसशी संबंधित विदेशी नागरिकांनी बोगस ओळखपत्रांचा वापर करुन मोबाइल क्रमांक घेतले. सीम कार्ड दलालांच्या माध्यमातून 12500 रुपयांना एक या हिशोबानं खरेदी केली होती. ती नेपाळच्या मार्गे मागवण्यात आली होती. सुर्वेनं त्या कंपनीत स्थापनेनंतर संचालक म्हणून काम केलं. यूक्रेनचा नागरिक ओलेना स्टोयन हा देखील संचालक होता”, असेही तौसिफ रियाजने म्हटले.


हेही वाचा – Torres Scam : टोरेसची तीन बँक खाती गोठवली, तक्रार करण्यासाठी गुंतवणूकदारांची दादर पोलिसांत गर्दी

Vaibhav Patil
Vaibhav Patil
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.