घरताज्या घडामोडीCoronaVirus: ताज हॉटेलमुळे 'ए' विभागातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४९वर!

CoronaVirus: ताज हॉटेलमुळे ‘ए’ विभागातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४९वर!

Subscribe

मुंबईतील कंपन्यांच्या कार्यालयांसह सरकारी कार्यालये तसेच कॉर्पोरेट कार्यालये असलेल्या महापालिकेच्या ‘ए’ विभागाच्या डोक्यावर आता कोरोनाचा ताज चढला गेला. कोरोनाबाबतची भीती व्यक्त होत असतानाच १८ मार्चपासून या विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली. परंतु एकाच वेळी ताज हॉटेलमधील २२ जणांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे या विभागातील कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढला. त्यामुळे सुरुवातील नियंत्रणात असलेल्या या विभागात ताज हॉटेलमधील बोनस पॉईंटने कोरोनाग्रस्तांची संख्या ४९वर पोहोचली आहे.

मुंबईतील कुलाबा, फोर्ट, नरिमन पॉईंट या ‘ए’ विभागामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ही ४९वर पोहोचली आहे. या विभागात पहिले कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण हे ताज हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या रुपात आढळून आला. त्यानंतर या कोरोनाग्रस्तांच्या निकटच्या संपर्कातील सहकारी कर्मचाऱ्यांची तपासणी केल्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ झाली. या एकाच हॉटेलमधून एकाच वेळी २२ कोरोनाचे रुग्ण आढळून आले. त्यानंतर ताज मधील जे कर्मचारी गीता नगर, शिवशक्ती नगर येथे राहायचे तेथीलही विभाग प्रतिबंधित करत तेथेही कोरोना रुग्णांचा शोध घेण्यात आला. त्यामुळे त्यानंतर धिम्या गतीने का होईना, रुग्णांचा आकडा पन्नाशीच्या आसपास जाऊन पोहोचला आहे.

- Advertisement -

‘ए’ विभागाच्या सहाय्यक आयुक्त चंदा जाधव यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याचा महापालिकेने निर्णय घेतल्यानंतर फॅशन स्ट्रीट आणि कुलाबा कॉजवे हे महत्वाचे खरेदीचे स्पॉट बंद केले होते.

सुरुवातील ६ एप्रिल रोजी या ‘ए’ विभागात केवळ ६ रुग्ण होते. परंतु ताज हॉटेलच्या एका हॉटस्पॉटमुळे येथील संख्या वाढल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या विभागात सिटी पॅलेस, सी लॉर्ड आणि वेलकम या तीन हॉटेलमध्ये क्वारंटाईनची व्यवस्था केली आहे. या तिन्ही ठिकाणी सुमारे ६० लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: सोमवारपासून आयटी कंपन्या ५० टक्के कर्मचाऱ्यांसह काम सुरू करू शकतात


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -