घरक्राइममुंबईतील फरार सराफा व्यापारी अटकेत; बँकेची 42 कोटींची फसवणूक

मुंबईतील फरार सराफा व्यापारी अटकेत; बँकेची 42 कोटींची फसवणूक

Subscribe

आरोपी असलेल्या कंपनीच्या खात्यांचे ऑडिट केले असता त्यात असे आढळून आले की, कंपनी आणि कंपनीच्या मालकाने कर्जाच्या पैशाचा वापर कंपनी संबंधित कामांसाठी झाला नसून इतर कामांसाठी झाला.

मुंबईतील (mumbai) त्रिभोवनदास भीमजी झवेरी (TBZ) अँड सन्स ज्वेलर्सच्या प्रवर्तकाला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. अॅक्सिस बँकेची (axis bank) 42.5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली या प्रवर्तकाला अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर कर्जाच्या पैशाचा वापर इतर कारणांसाठी केल्याचेसुद्धा समोर आले आहे.

कर्जाचे पैसे इतर कारणांसाठी वापरले
अॅक्सिस बँकेची 42.5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईतील  त्रिभोवनदास भीमजी झवेरी अँड सन्स रिटेल प्रायव्हेट लिमिटेड या ज्वेलरी कंपनीच्या प्रवर्तकाला अटक केली. आरोपी ज्वेलर्सने कथितपणे खाजगी बँकेकडून कॅश क्रेडिट सुविधेचा लाभ घेतला होता. पण घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात कंपनी अपयशी ठरली. आरोपी असलेल्या कंपनीच्या खात्यांचे ऑडिट केले असता त्यात असे आढळून आले की, कंपनी आणि कंपनीच्या मालकाने कर्जाच्या पैशाचा वापर कंपनी संबंधित कामांसाठी झाला नसून इतर कामांसाठी झाला.

- Advertisement -

मागील सहा महिन्यांपासून फरार
याप्रकरणी 63 वर्षीय आरोपी असलेले ज्वेलर्स हेमंत व्रजलाल झवेरी याने आपले घरसुद्धा विकले होते. त्यानंतर मागील सहा महिन्यांपासून तो फरार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. फरार झाल्यानंतर आरोपी ज्या ठिकाणी अनेक महिने लपला होता त्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली आणि अखेर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी सायंकाळी आरोपीला मुलुंड (पश्चिम) (mulund) येथील त्याच्या फ्लॅटमधून अटक केली.

बँकेचीही फसवणूक
मौल्यवान धातू आणि हिरे यांच्या विक्री – खरेदीसाठी आरोपीने 2015 सालात कॅश क्रेडिट सुविधा मिळविण्यासाठी एक्सिस बँकेकडे अर्ज केला होता. आरोपीने केलेल्या अर्जानुसार, बँकेकडून सप्टेंबर 2015 सालात कंपनीने अटी आणि शर्ती मान्य केल्यानंतर 36 कोटी रुपयांची कॅश क्रेडिट सुविधा मंजूर करण्यात आली होती. पहिल्या काही वर्षांत कंपनीकडून बँकेला कर्जाच्या मासिक हप्त्यांची नियमित परतफेड करण्यात येत होती. पण मे 2019 सालापासून कर्जाच्या हप्त्यांची परतफेड कंपनीकडून येणे बंद झाले. यासंबंधी बँकेकडून वारंवार तगादाही लावला गेला तरीही बँकेला मासिक हप्ते मिळाले नाहीत आणि आखेल पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

कॅश क्रेडिट सुविधेचा लाभ घेऊन फरार 
अॅक्सिस बँकेची (axis bank) 42 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यानंतर बॅंकेने मुंबई पोलिसांना घडलेल्या सर्व प्रकारची माहिती दिली. माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासाअंती मुंबईतील त्रिभोवनदास भीमजी झवेरी अँड सन्स रिटेल प्रायव्हेट लिमिटेड या ज्वेलरी कंपनीच्या प्रवर्तकाला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. आरोपी ज्वेलर्सने खाजगी बँकेकडून कॅश क्रेडिट सुविधेचा लाभ घेतला आणि त्यांनतर तो सहा महिने फरार होता.


हे ही वाचा –  नाशिकरोड कारागृहातून कैदी फरार; प्रशासनाला दीड वर्षाने आली जाग

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -