Traffic Jam: मुंबई इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठी वाहतूक कोंडी

मुंबईच्या इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. मंबई इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

मुंबईच्या इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून (Mumbai Eastern Express Highway) प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. मंबई इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली आहे. सोमवारी सकाळी मुंबईच्या (Mumbai) इस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या मुलूंड ते कांजूरमार्ग या मार्गादरम्यान वाहतूक कोंडी झाली आहे. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने जवळपास 7 किलोमिटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

जेवीएलआरकडे जाणाऱ्या मार्गिकेवर मेट्रोचे काम  (Metro Work) सुरू आहे. या मेट्रोच्या कामांमध्ये अडथळे येऊ नये यासाठी ही मार्गिका बंद करण्यात आली आहे. ही वाहतूक कोंडी जवळपासून 7 किलोमीटर लांब इतकी आहे. या वाहतूक कोंडीमुळे ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

परिणामी, प्रवाशांना (Passengers) या वाहतूक कोंडीतून बाहेर येण्यासाठी तास ते दीड तास लागत आहे. दरम्यान, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी वाहतूक कोडींमध्ये अडकल्याने अनेक प्रवाशांना लेट मार्कचा (Office late Mark) सामना करावा लागला. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्ताप सहन करावा लागतोय.

मुंबईत अनेक ठिकाणी मेट्रोची कामे (Metro Work) सुरू आहेत. या कामांमुळे अनेक रस्त्यांवर एक मार्गिका सुरू ठेवली असून, याच मार्गिकेवरून दोन्ही मार्गाची चालवली जातेय. रस्ता लहान त्यात दोन्ही बाजून वाहनांची गर्दी असल्याने वाहनांची लांब राग लागते. परिणामी वाहनचालकांना गाडीतच तासंतास थाबून राहावे लागत आहे.


हेही वाचा – संभाजीराजे छत्रपतींची ढाल करण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा फडणवीस आणि भाजपावर आरोप