घरमुंबईलहान वयात मुलांना मिळणार वाहतुकीचे धडे

लहान वयात मुलांना मिळणार वाहतुकीचे धडे

Subscribe

अपघात टाळायचे असतील तर वाहतूक नियमांचे प्रत्येकानेच पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थी दशेत असल्यापासूनच वाहतुकीच्या नियमाविषयी जागृती झाल्यास भविष्यात वाहतूक नियमांचे पालन करणारा एक नागरिक घडणार आहे. या हेतूनेच पालिकेने हे गार्डन तयार केले आहे. साधारण दोन एकर भूखंडावर हे ट्रॅफिक गार्डन विकसित करण्यात आले आहे.

वाहतुकीच्या नियमांची लहान वयातच माहिती मिळावी या हेतूने ठाणे महापालिकेने घोडबंदर येथील कावेसर भागात चिल्ड्रन ट्रॅफिक गार्डन साकारले आहे. शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेयांच्या हस्ते बुधवारी ट्रॅफिक गार्डनचे लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे या ट्रॅफिक गार्डनमधून लहान वयातच मुलांना वाहतुकीच्या नियमांचे धडे मिळणार आहे.
प्रत्येक वाहन चालकाने साध्या सोप्या वाहतूक नियमांचे पालन केले तर वाहनांमुळे होणारे अपघात कमी होतील.

बेशिस्त वाहतुकीवर अंकुश लावण्यासाठी पोलीस त्याची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी रेाजच झटत असतो. उपलब्ध मनुष्यबळात आणि साधनसामुग्रीत पोलिसांची धडपड सुरू असते. अपघात टाळायचे असतील तर वाहतूक नियमांचे प्रत्येकानेच पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थी दशेत असल्यापासूनच वाहतुकीच्या नियमाविषयी जागृती झाल्यास भविष्यात वाहतूक नियमांचे पालन करणारा एक नागरिक घडणार आहे. या हेतूनेच पालिकेने हे गार्डन तयार केले आहे.
साधारण दोन एकर भूखंडावर हे ट्रॅफिक गार्डन विकसित करण्यात आले आहे.

- Advertisement -

यातून विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम आणि सिग्नल यंत्रणेची माहिती मिळणार आहे. तसेच वाहन कसे चालवावे? याविषयीची माहिती देण्यासाठी सिम्युलेशन सेंटर तयार करण्यात आले आहे. यामध्ये प्रात्याक्षिकाद्वारे दुचाकी, चारचाकी चालविण्याविषयी माहिती मिळणार आहे. पार्कमध्ये सायकल ट्रॅकही तयार करण्यात आला आहे. सुरक्षित वाहतुकीच्या प्रशिक्षणाची खोली, दुचाकी आणि चार चाकी वाहनांकरीता सिम्युलेशन ब्लॉक, दुचाकी व चारचाकीसाठी मार्गिका, सायकल ट्रॅक, दुचाकी वाहनांसाठी प्रौढ प्रशिक्षण पथ आरटीओ वाहन परवान्याकरीता स्वतंत्र खोली, सुरक्षा केबीन आदी ट्रॅफिक गार्डनमध्ये साकारण्यात आलय. त्यामुळे लहान मुलांना खेळातूनच वाहतूक नियमांचे प्रशिक्षण मिळणार आहे.

उड्डाणपुलाखाली साकारल आकर्षक उद्यान
नितीन कंपनी जंक्शन तसेच माजीवडा येथील उड्डाणपुला खालील मोकळ्या जागेत पालिकेने देखणी उद्याने साकारली आहेत. यामध्ये जॉगिंग टॅ्रक, मुलांसाठी स्केटींगची सोय करण्यात आली आहे. तसेच दिव्यांची आकर्षक रचना ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने उड्डाणपुलांखालील जागेत पार्किंगला मनाई केली आहे. त्यामुळेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे आकर्षक उद्यान साकारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटनही आदित्य ठाकरे यांनी केले.

- Advertisement -

प्लास्टीक बंदीच्या माहितीपटाचा विशेष खेळ

पर्यावरणाला सर्वाधिक धोका प्लास्टिकपासून असल्यामुळे प्लास्टिक बंदीसाठी आदित्य ठाकरे आग्रही आहेत. त्यांच्या पुढाकाराने एका माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हा माहितीपट बुधवारी सुलोचनदेवी सिंघानिया विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी दाखविण्यात आला. आदित्य ठाकरे यांनीही विद्यार्थ्यांसह एकत्र बसून हा माहितीपट पाहिला आणि विद्यार्थ्यांशी प्लॅस्टिक बंदी या विषयावर मनमोकळया गप्पा मारल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -