घरमुंबईशाळांमध्येही होणार मासिक पाळीवर प्रशिक्षण

शाळांमध्येही होणार मासिक पाळीवर प्रशिक्षण

Subscribe

किशोरवयीन मुलींसाठी विशेष उपक्रम

किशोरवयीन मुलींना मासिक पाळी आल्यावर त्यांची कुचंबना होते. त्यामुळे बहुतांश मुली या शाळेत अनुपस्थित राहतात. मुलींचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्या प्राधिकरणातर्फे मुलींमध्ये मासिक पाळीबाबत जागरुकता करण्यासाठी सर्व शाळांमध्ये मासिक पाळी व्यवस्थापन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार सहावी ते दहावीतील किशोरवयीन मुलींना 19 ते 25 सप्टेंबरपर्यंत शाळांमध्ये विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय हे राष्ट्रीय अभियान सप्टेंबर 2014 पासून केंद्र सरकारने सुरू केले आहे. या अभियानांतर्गत किशोरवयीन मुलींच्या मासिक पाळीवर विशेष भर देण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या 2009 मधील अहवालानुसार 12 टक्के मुली मासिक पाळीदरम्यान शाळेत अनुपस्थितीत राहतात. मासिक पाळी आल्यावर मुलींची मानसिक कुंचबना होते. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान मुली शाळेत येणे टाळतात. ही बाब लक्षात घेऊन किशोरवयीन मुलींची शाळेत कुचंबना होऊ नये, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण), समता विभाग आणि यूनिसेफअंतर्गत मासिक पाळी व्यवस्थापन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील सहावी ते दहावीतील किशोरवयीन मुलींसाठी विशेष कार्यक्रम घेण्यात येणार असून, त्यासाठी विद्या प्राधिकरणामार्फत शिक्षकांना प्रशिक्षण देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. शिक्षकांसाठी 19 ते 25 सप्टेंबरदरम्यान तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

19 सप्टेंबरला सांताक्रुझमधील सेंट चार्ल्स हायस्कूल तर अंधेरीतील डिव्हाईन चाईल्ड हायस्कूल येथे प्रशिक्षण शिबीर झाले. त्याचप्रमाणे 20 सप्टेंबरला अंधेरीतील श्रीराम वेल्फेअर हायस्कूल व दहिसरमधील मेरी इम्याक्युलेट हायस्कूल, 23 सप्टेंबरला मालाडमधील सेंट जोसेफ हायस्कूल व 25 सप्टेंबरला बोरिवलीतील चोगले हायस्कूलमध्ये हे प्रशिक्षण होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -