HomeठाणेTrans Harbour : ट्रान्स हार्बरची वाहतूक विस्कळीत; तुर्भे-कोपरखैराणे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड

Trans Harbour : ट्रान्स हार्बरची वाहतूक विस्कळीत; तुर्भे-कोपरखैराणे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड

Subscribe

ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ट्रान्स हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास तुर्भे आणि कोपरखैराने स्थानकादरम्यान तात्रिक बिघाड झाल्याने रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुंबई : ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ट्रान्स हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास तुर्भे आणि कोपरखैराणे स्थानकादरम्यान तात्रिक बिघाड झाल्याने रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वेचे अधिकारी तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले असल्याची माहिती समोर येत आहे. (Trans Harbour Railway traffic disrupted Technical failure between Turbhe Koparkhairane station)

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास तुर्भे आणि कोपरखैराणे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या खोळंबल्या आहेत. परिणामी प्रवाशांना नाहक त्रास समान करावा लागतो आहे.

तुर्भे आणि कोपरखैराने स्थानकातील तांत्रिक बिघाडाची माहिती मिळताच रेल्वेचे कर्मचारी बिघाड झालेल्या ठिकाणी तातडीने दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, शर्तीच्या प्रयत्नांवर वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न रेल्वे कर्मचाऱ्यांकडून केले जात आहेत.

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

दरम्यान, नवीन वर्षाच्या सुरुवातीला पश्चिम रेल्वेचा मोठा खोळंबा झाला होता. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील अनेक लोकल, एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे अनेक लोकल उशिराने धावत होत्या. या कारणाने प्रवाशांचे मोठे हाल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील 20-25 दिवसांपासून पश्चिम उपनगरीय रेल्वे वाहतूक उशिराने धावत आहे. पश्चिम रेल्वेवर काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. यामुळे सध्या पश्चिम रेल्वेच्या लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. यामुळे प्रवाशी संतप्त झाले आहेत. अनेक प्रवाशांनी याबद्दल ट्वीटरवर तक्रार नोंदवली आहे. यावर रेल्वेने स्पष्टीकरण दिले आहे.

त्यानुसार, “प्रिय प्रवाशांनो, आम्ही कायमच रेल्वे लोकल मूळ स्थानकावरुन वेळेत सोडण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र दरम्यानच्या स्थानकावर काही मिनिटांसाठी उशीर होऊ शकतो. काहीवेळा आत्महत्या, अलार्म, चैन खेचणे, रेल्वे ट्रॅकवर गुरेढोरे धावणे यासारख्या समस्या निर्माण होतात. तसेच एकाच रेल्वे मार्गावर लोकल गाड्या, एक्सप्रेस धावत असतात. त्यामुळे रेल्वे उशिराने धावत असतात. तरी सध्या ट्रेन वेळेवर आणण्यासाठी एक गट 24 तास काम करत आहेत. याबाबत विविध उपाययोजना केल्या जात आहेत”, असे पश्चिम रेल्वेने सांगितले आहे.


हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : संतोष देशमुखांच्या आरोपींना मुख्यमंत्री फडणवीस सोडणार नाहीत, मंत्री बावनकुळेंचा दावा