घरमुंबईतीन दिवसाच्या आतच मुंबईतील पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द 

तीन दिवसाच्या आतच मुंबईतील पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द 

Subscribe
मुंबई पोलीस दलात अंतर्गत करण्यात आलेल्या १० पैकी ८ पोलीस उपायुक्त यांच्या बदल्या रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसा आदेश जारी करण्यात आलेला आहे. बदल्या करण्यात आलेल्या सर्व पोलीस उपायुक्तांनी आजच्या आज आपल्या जुन्या नेमणुकीच्या ठीकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या बदल्या रद्द करण्याची ही पहिलीच वेळ असल्याची बोलले जात असून शासनाच्या अंतर्गत वादातून या बदल्या रद्द करण्यात आल्याची चर्चा जेष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे.
Posting Cancel-1
Posting Cancel-3
मुंबई पोलीस दलातील पोलीस उपायुक्त दर्जाच्या १० अधिकाऱ्यांच्या गुरुवारी मुंबई अंतर्गत बदल्या करण्यात आलेल्या होत्या. बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी तत्काळ नवीन नेमणुकीच्या ठिकाणी रुजू व्हावे असे मुंबई पोलिस आयुक्तांकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले होते. या आदेशानुसार बदल्या करण्यात आलेल्या पोलीस उपायुक्तांनी शुक्रवारी नवीन नेमणुकीच्या ठीकाणचा पदभार स्वीकारला होता. ४८ तासांच्या आतच दहाच्या दहा अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्याचा आदेश गृहविभागाकडून रविवारी जारी करण्यात आला असून बदली करण्यात आलेल्या पोलीस उपायुक्तांनी ताबडतोब जुन्या नेमणुकीच्या ठिकाणचा पदभार स्वीकारावा असे गृहविभागाकाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे.

पोलीस उपायुक्त यांच्या गेल्या आठवड्यात करण्यात आलेल्या बदल्यांबाबत गृहमंत्री तसेच गृहविभागाला अंधारात ठेवून या बदल्या करण्यात आल्या होत्या, अशी चर्चा जेष्ठ पोलीस अधिकारी यांच्यात सुरू आहे. पोलीस उपायुक्त दर्जाच्या करण्यात आलेल्या बदल्यामुळे शासनातील अंतर्गत वाद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -