घरक्राइमबलात्काराचा गुन्हा मागे घेण्याकरता तृतीयपंथीयावर ब्लेडने हल्ला, फिनाईल पाजण्याचाही प्रयत्न

बलात्काराचा गुन्हा मागे घेण्याकरता तृतीयपंथीयावर ब्लेडने हल्ला, फिनाईल पाजण्याचाही प्रयत्न

Subscribe

मुंबई – बलात्काराचा गुन्हा मागे घेण्याकरता एका तृतीयपंथी व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तसंच, तिला जबरदस्ती फिनाईल पाजण्यात आलं होतं. याप्रकरणी पीडितेने सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी एका आरोपीला विलेपार्लेतून अटक केली असून दोघांचा शोध सुरू आहे.

रविवारी सकाळी १.४५ वाजता पीडिता तिच्या मैत्रीणीसोबत जुहू तारा रोडवरून जात होती. तेवढ्यात एका रिक्षातून तिघेजण आले आणि त्यांनी पीडितेच्या मानेवर आणि खांद्यावर ब्लेडने सपासप वार केले. तिला जबरदस्तीने फिनाईल पाण्याजत आलं. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. दरम्यान, पीडितेच्या मैत्रीणीने तिला वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल केलं.

- Advertisement -

याप्रकरणी पुन्हा आरोपींविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी लागलीच याप्रकरणी तपासकार्य सुरू करत एका आरोपीला विलेपार्लेतून अटक केली. तर, आणखी दोघेजण बेपत्ता असून ते दोघेही नवरा-बायको आहेत. पीडितेने २०१४ रोजी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली होती. ती तक्रार मागे घेण्याकरता आरोपींनी पुन्हा तिच्यावर हल्ला केला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -