‘शनी’च्या राशीत ‘सूर्या’चा प्रवेश; आता ‘या’ 5 राशीच्या लोकांना होणार जबरदस्त फायदा

सूर्य हा यश, कीर्ती, आरोग्य, नेतृत्व इत्यादींचा कारक ग्रह आहे. यामुळे 14 जानेवारी रोजी तो मकर राशीत (horoscope) शनीच्या राशीत प्रवेश करणार आहे.

do you know todays horoscope find out horoscope future

ग्रहांच्या राशी प्रवेशाचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. हा बदल ग्रहांचा राजा सूर्याच्या (Sun in capricorn) स्थितीत असेल तर त्याचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो. कारण सूर्य हा यश, कीर्ती, आरोग्य, नेतृत्व इत्यादींचा कारक ग्रह आहे. यामुळे 14 जानेवारी रोजी तो मकर राशीत (horoscope) प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशीच्या लोकांसाठी हा प्रवेश खूप शुभ मानला जात आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना याचा जबरदस्त फायदा होणार आहे. (Surya Gochar)

मेष

मेष राशीसाठी सूर्याचा राशी प्रवेश खूप शुभ राहील. तुमच्या करिअरमध्ये मोठी प्रगती राहिल. प्रमोशनाची संधी मिळेल. सरकारी क्षेत्र किंवा राजकारणाशी संबंधित लोकांचे करिअर उजळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. वेगळी ओळख निर्माण करता येईल.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश मिळेल. उत्पन्न वाढल्याने मोठी बचत होईल. जुन्या समस्या संपल्यावर तुम्ही सुटकेचा नि:श्वास टाकाल. कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी उत्कृष्ट राहील. काही चांगली बातमी तुमचे जीवन आनंदी आणि प्रसन्न करेल.

सिंह

सिंह राशीचा स्वामी हा सूर्य आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांवर सूर्याच्या राशी प्रवेशाचा अधिक प्रभाव राहील. प्रमोशन-इन्क्रीमेंट मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्ही तुमच्या कामाने सर्वांची मनं जिंकाल. अनेक दिवसांपासून तुमच्या मनात जी इच्छा होती, ती आता पूर्ण होणार आहे.

वृश्चिक

नवीन नोकरीच्या ऑफर मिळतील. सरकारी क्षेत्राशी संबंधित लोकांना मोठे यश मिळू शकते. धनलाभ होईल. एकंदरीत हा काळ खूप छान असेल.

मीन

मीन राशीच्या लोकांना करिअरमध्ये धनासोबत प्रसिद्धी, मोठे पद मिळेल. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये एका उंचीवर पोहोचाल, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. राजकारणात सक्रिय असलेल्या लोकांना मोठे पद मिळू शकते.


30 वर्षानंतर शनि देवांचा कुंभ राशीत प्रवेश; ‘या’ ४ राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात मिळेल चांगला नफा