घरमुंबईएकाच तिकिटावर करा रेल्वे,मेट्रो आणि बसमधून प्रवास

एकाच तिकिटावर करा रेल्वे,मेट्रो आणि बसमधून प्रवास

Subscribe

‘एक देश एक कार्ड’ आधारे प्रवाशांना एक कार्ड किंवा तिकीट दिण्यात येणार आहे. तसेच त्याचा वापर सर्व सार्वजनिक वाहतुकीत प्रवासासाठी करता येईल.

मुंबई आणि गर्दी हे समीकरण एकच आहे. दररोज कामावरुन सुटून मुंबईकर कशीतरी वाट काढत काढत बसस्टॉरच्या रांगेत ऊभा राहतो यानंतर ट्रेनच्या तिकीटाच्या मागे त्याला पायपीट करावी लागते.आशातच तिकीटाच्या रांगेमध्ये अनेकदा त्याला ट्रेन किंवा बसची वेळसुद्धा चुकवावी लागते. पण मुंबईकरांचा प्रवास आता सुखकर होणार असल्याची आनंददायक बातमी समोर येत आहे. लवकरच मुंबईकरांसाठी एकात्मिक तिकीट प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येणार अल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजेच या नव्या प्रणाली अंतर्गत रेल्वे, मेट्रो, मोनो, बससाठी एकच तिकिट योजना राबवण्यात येणार आहे.

नव्या तिकिट प्रणालीची सुरुवात करण्यात आली असून मेट्रो २ दहिसर ते डी.एन.नगर आणि दहिसर ते अंधेरी या मेट्रो सातसाठी या योजनेची पडताळणी सुरू करण्यात आली असल्याची माहिती एमएमआरडीएकडून (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) देण्यात आली. तसेच सध्या या दोन्ही मार्गावर मेट्रो रेल्वेगाडय़ांची चाचणी देखिल सुरु आहे.

- Advertisement -

एकच तिकिट प्रणाली योजना गेल्या कित्येक वर्षांपुर्वी आखण्यात आली होती. मुंबईतील प्रवाशांसाठी दररोजचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे, मेट्रो, मोनो, बेस्ट व इतर सार्वजनिक परिवहन उपक्र मांसाठी एकच तिकीट करण्यात येणार आहे.या योजनेचा लवकरात लवकर लागूकेला गेल्यास प्रवाशांसाठी नक्कीच हि एकात्मिक तिकीट प्रणाली फायदेशीर ठरणारी आहे. माहितीनुसार एमएमआरडीएकडून मेट्रो २ अ दहिसर ते डी.एन.नगर आणि मेट्रो ७ दहिसर ते अंधेरी प्रकल्प राबविण्यात आला आहे. सध्या यातील दोन्ही मार्गावर डहाणूकरवाडी ते आरे दरम्यान २० किलोमीटर अंतरावर मेट्रो रेल्वेगाडय़ांची चाचणी सुरू आहे. या संपूर्ण मार्गावरील पहिला टप्पा ऑक्टोबर २०२१ पासून आणि त्यानंतर पूर्ण मार्गावर मेट्रो गाडय़ा जानेवारी २०२१ किंवा त्यानंतर चालवण्याचे नियोजित आहे. मार्ग सेवेत येताच प्रवाशांसाठी एकात्मिक तिकीट प्रणालीची अंमलबजावणी होईल. त्यानंतर इतर मेट्रो आणि मोनो रेल मार्गासाठी आणि बेस्ट, रेल्वेसाठीही टप्प्याटप्यात अंमलबजावणी केली जाईल, असे ‘एमएमआरडीए’कडून स्पष्ट करण्यात आले.

नक्की कसे काम करणार

प्रवासात तिकीट किंवा पास काढण्यासाठी लागणाऱ्या रोख रकमेचा व्यवहार टाळण्यासाठी आणल्या जाणाऱ्या ‘एक देश एक कार्ड’ योजनेला प्रायोगिक तत्त्वावर बेस्ट उपक्रमा सध्या सुरुवात झाली असून त्याच्या तांत्रिक चाचण्या सुरू आहेत. हे कार्ड रेल्वे, मेट्रो-मोनोसाठीही वापरता येणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून ‘वन नेशन, वन कार्ड’साठी लागणाऱ्या हार्डवेअरच्या चाचणीला कुलाबा आणि वडाळा आगारात सुरुवात के ली आहे. हे कार्ड ‘एक देश एक कार्ड’ आधारे प्रवाशांना एक कार्ड किंवा तिकीट दिण्यात येणार आहे. तसेच त्याचा वापर सर्व सार्वजनिक वाहतुकीत प्रवासासाठी करता येईल. यातूनच तिकिटांचे पैसे वजा होत जाणार अल्याचे कळतेय

- Advertisement -

हे हि वाचा – मंत्रालय बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात, तपासात समोर आलं धक्कादायक कारण


 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -