घरमुंबईपर्यावरणासाठी 'ट्री गणेशा'चा पर्याय

पर्यावरणासाठी ‘ट्री गणेशा’चा पर्याय

Subscribe

यंदा राज्य सरकारकडून थर्माकोल आणि प्लॉस्टिकवर बंदी घातल्याने सार्वजनिक मंडळाबरोबरच घरगुती गणेशोत्सव साजरा करणार्‍यासमोर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. गणेशभक्तांच्या या प्रश्नाला उत्तर म्हणून सध्या बाजारपेठेत अनेक इकोफ्रेंडली पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत.

राज्य सरकारने राज्यभरात प्लास्टिक आणि थर्माकोल बंदी लागू केली आहे. गणेशोत्सवात प्लास्टिक आणि थर्माकोलचा जास्त वापर केला जातो, पण त्यामुळे पर्यावरणावर त्याचा दुष्परिणाम होतो. त्याविषयीची जागृती लोकांमध्ये होत आहे. त्यामुळे मुंबईकरांची इको फ्रेंडली गणेशोत्सवाला अधिक पसंती मिळताना दिसत आहे. गेल्या वर्षीपासून ट्री गणेशा हा नवा पर्याय मुंबईकरांचे लक्ष वेधत आहे. याबरोबरच शाडूच्या मूर्तीच्या मागणीतही वाढ झाल्याची माहिती मूर्तीकारांकडून देण्यात आली. थर्माकोलच्या जागी फुलांचे मखर बुक करण्यासाठी मुंबईकरांची लगबग सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
मुंबईसह राज्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर उत्सवाला आवश्यक असलेल्या विविध वस्तूंनी आणि समाजवटीच्या साहित्यांनी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. यंदा राज्य सरकारकडून थर्माकोल आणि प्लॉस्टिकवर बंदी घातल्याने सार्वजनिक मंडळाबरोबरच घरगुती गणेशोत्सव साजरा करणार्‍यासमोर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. गणेशभक्तांच्या या प्रश्नाला उत्तर म्हणून सध्या बाजारपेठेत अनेक इकोफ्रेंडली पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत.

काय आहे ट्री गणेशा
एका कुंडीमध्ये लाल मातीची गणेश मूर्ती बसवली जाते. ती बनवताना त्या मूर्तीत वेगवेगळ्या झाडांच्या बिया भरल्या जातात. दहा दिवस गणपतीची पूजा केली जाते. त्यानंतर विसर्जनाच्या दिवशी या मूर्तीवर पाणी ओतण्यात येते. यामुळे लाल मातीची मूर्ती विरघळते. त्यातील बिया वाढून कुंडीत झाडे उगवतात. हा ट्री गणेशा साधारण ९ इंच, १२ इंच, १५ इंच व १८ इंचामध्ये उपलब्ध आहे. ज्याची किंमत साधारणपणे २२०० ते ४५०० रुपयांच्या दरम्यान आहे.

- Advertisement -

शाडूच्या मूर्ती
खूप अगोदरपासून शाडूच्या मूर्ती बनवल्या जातात. या सर्व मूर्ती अगदी अर्ध्या फूटापासून वेगवेगळ्या उंचीच्या असतात. विसर्जनाच्या वेळी याने पर्यावरणाला हानी होत नाही. मात्र या मूर्ती वजनाने जड असतात. याची किंमत साधारणपणे १५०० रुपयांपासून सुरु होते.

घरगुती गणेशमर्तींसाठी फायबर प्रभावळ
आजपर्यंत मुंबईमध्ये फक्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तीना फायबर प्रभावळ असे, मात्र आता घरगुती मूर्तींनादेखील फायबरची प्रभावळ उपलब्ध आहे. यामुळे मूर्तीदेखील हलकी होते आणि ती प्रभावळ काढताही येते. ज्याच्यामुळे ही प्रभावळ पुढच्या वर्षीदेखील पुन्हा वापरता येईल. याची किंमत साधारण ६ हजारापासून सुरु होते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -