घरमुंबईसामाजिक वनीकरणाची वृक्ष लागवड करपली

सामाजिक वनीकरणाची वृक्ष लागवड करपली

Subscribe

देखभाली अभावी हजारो रोपे नष्ट

राज्य सरकारच्या सामाजिक वनीकरण विभागाकडून पावसाळ्यात करण्यात आलेली वृक्ष लागवड योजना सामाजिक वनीकरणाच्या ढिसाळ कारभारामुळे फोल ठरली आहे. मान्सून मोसमात वृक्ष लागवड केलेली हजारो रोपे देखभाली अभावी करपून गेली आहेत, ही सर्व वृक्षे आता अखेरच्या घटका मोजत आहेत.

शहापूर सामाजिक वनीकरणाच्या परीक्षेत्रात तालुक्यातील ग्रामीण भागातील 110 ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात मुख्य गाव पाड्यांच्या लगत व रस्त्याच्या कडेला पावसाळ्याच्या मोसमात सामाजिक वनीकरण विभागाने 1 लाख 8 हजार रोपांची लागवड केली. सामाजिक वनीकरण विभागाने लागवड केलेल्या रोपांची फारच दैन्यावस्था असून यातील बहुतांश रोपांनी लागवडी नंतर आठच दिवसांत माना टाकल्या आहेत.

- Advertisement -

तालुक्यातील नांदवळ, अल्याणी, बाबळे, गेगाव आदी भागात तर रोप लागवड करताना सामाजिक वनीकरण विभागाने अगदी निष्काळजीपणाने खडकाळ अशा जागेवर रोप लागवड केली आहे. खडकाळ जागेत रोपे लावण्यात आल्याने ती मातीत व्यवस्थित रुतली नाहीत. परिणामी ही रोपे मरून गेली तर काही रोपे पाण्याच्या नाल्यालगत लागवड केल्याने वाहत्या नाल्याच्या पाण्यात वाहून गेली आहेत, तर काही रोपे पाण्यात कुजली आहेत.

सामाजिक वनीकरण विभागाच्या बेजबाबदारपणामुळे व रोपांची देखभाल न झाल्याने पावसाळ्यात लागवड तीन महिन्यांतच करपून नष्ट झाली आहेत. करपून उद्ध्वस्त झालेल्या या रोपांमध्ये आवळा, काजू, करंज, पेरु, सीताफळ, चिंच, बेल, बाबळा आदी रोपांचा समावेश आहे. ही रोप लागवड करताना सामाजिक वनीकरण विभागाने मजुरांना दैनंदिन मजुरी देऊन या रोपांची भर पावसात जून महिन्यात लागवड केली होती.

- Advertisement -

परंतु सामाजिक वनीकरण विभागाची ही योजना शहापूर तालुक्यात फोल ठरली आहे. असे विदारक असे चित्र दिसत आहे. रोप लागवडीसाठी लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला असून या घटनेमुळे राज्य सरकारच्या तेरा कोटी वृक्ष लागवड योजनेचा फज्जा उडाला आहे.

आम्ही दरवर्षी प्रमाणे शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात येणार्‍या गाव पाड्यांवर एकूण 1लाख 8 हजार रोपांची लागवड केलेली आहे.
– संग्राम जाधव, शहापूर वनपरिक्षेत्र अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -