घरमुंबईसच्चा शिवसैनिक कदापी अविश्वास दाखविणे शक्य नाही - सुभाष देसाई

सच्चा शिवसैनिक कदापी अविश्वास दाखविणे शक्य नाही – सुभाष देसाई

Subscribe

तीन दिवस राज्यात राजकीय नाट्य सुरू आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बडखोरीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिंदे यांच्या नाराजीबाबात शिवसेनेचे जेष्ठ नेते सुभाष देसाई यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी याबाबतचे एक ट्विट केले आहे.

या ट्विटमध्ये शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र, शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात कोणताही सच्चा शिवसैनिक कदापि अविश्वास दाखविणे शक्य नाही, असे सुभाष देसाई यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्री मुक्कामी –

- Advertisement -

शिंदे यांच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदारांना आवाहन केले आहे. शिंदे यांना मुख्यमंत्री पद हवे असल्यास आपण खुर्ची सोडण्यास तयार आहोत. फक्त समोर येऊन एकदा सांगा, मी तात्काळ राजीनामा देईन, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. त्यानंतर रात्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या कुटुंबासह मुख्यमंत्री निवासस्थान असलेला वर्षा बंगला सोडला आणि ते आपल्या मूळ निवासस्थानी मातोश्री येथे दाखल झाले आहेत.

किशोरा पेडणेकरांचे भावनिक आवाहन  –

महापौर किशोरी पेडणेकर यांनीही काल शिंदे यांना ‘परत या’ असे भावनिक आवाहन केले होते. यावेळी किशोरी पेडणेकर यांना अश्रू अनावर झाले होते. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -