घरताज्या घडामोडीइंदुरीकर यांना तृप्ती देसाईंची कायदेशीर नोटीस

इंदुरीकर यांना तृप्ती देसाईंची कायदेशीर नोटीस

Subscribe

किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्याविरोधात आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी वकिलामार्फत कायदेशी नोटीस बजावली आहे. त्यामुळे टिकेचे धनी बनलेल्या इंदुरीकरांच्या अडचणीत यामुळे आणखी वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

महिला आणि संततीबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्याविरोधात आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी वकिलामार्फत कायदेशी नोटीस बजावली आहे. त्यामुळे टिकेचे धनी बनलेल्या इंदुरीकरांच्या अडचणीत यामुळे आणखी वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. ‘महिलांचा वारंवार अपमान करणारे इंदुरीकर यांनी महिलांचा अपमान केल्याबाबत कोणतीही जाहीर माफी मागितलेली नाही. तसेच अशी वक्तव्य मी पुढे कीर्तनात करणार नाही, असे कोणत्याही पत्रकार परिषदेमार्फत त्यांनी जाहीर केलेले नाही. त्यांच्यावर पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यामुळे माझी बदनामी सुरू आहे. त्याचप्रमाणे मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या बाबतीत त्यांनी तातडीने सर्व महिलांची जाहीर माफी मागावी आणि अशी वक्तव्य यापुढे करणार नाही’, असे जाहीर करावे. यासाठी वकिलामार्फत तृप्ती देसाई यांनी नोटीस पाठवलेली आहे.

१० दिवसात माफी मागावी

इंदुरीकर यांना ॲडव्होकेट मिलिंद पवार यांच्या माध्यमातून ही नोटीस त्यांच्या पत्त्यावर पाठवली आहे. तसेच इंदुरीकर यांनी दहा दिवसात जाहीर माफी मागितली नाही तर न्यायालयात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे देखील त्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

काय बोले होते इंदुरीकर महाराज?

४ जानेवारीला यूट्युब चॅनेलवर अपलोड केलेल्या त्यांच्या कीर्तनाच्या व्हिडिओमध्ये त्यांनी ‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात, असे विधान केले होते. त्यानंतर या घटनेची दखल अहमदनगरमधील पीसीपीएनडीटी सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आली. या बैठकीमध्ये इंदुरीकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात करून पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम २२ चे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार इंदुरीकर महाराज यांना नोटीसही पाठवून पीसीपीएनडीटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय सल्लागार समितीकडून घेण्यात आला आहे. तसेच इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याबाबत पुरावे जमा करण्याचा निर्णयही समितीकडून घेण्यात आला आहे. तसेच यासंदर्भात अधिक पुरावे जमा करण्याचा निर्णयही समितीकडून घेण्यात आल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हा शल्य चिकित्सक तथा जिल्हा समुचित अधिकारी प्रदीप मुरंबीकर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -