घरमुंबई‘टर्न युअर बॉडी टु द सन’ ठरला सर्वोत्कृष्ट माहितीपट; MIFF चा समारोप...

‘टर्न युअर बॉडी टु द सन’ ठरला सर्वोत्कृष्ट माहितीपट; MIFF चा समारोप कार्यक्रम दिमाखात

Subscribe

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्यावतीने आयोजित केलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. 

दुसऱ्या महायुद्धाचे युद्धकैदी असलेल्या पित्याच्या शोधार्थ जाणाऱ्या निश्चयी मुलीची कथा मांडणाऱ्या ‘टर्न युअर बॉडी टु द सन’  (Turn your body to the sun) या नेदरलँड्च्या माहितीपटाला (Documentary) सतराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Mumbai International Film Festival) सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा प्रतिष्ठित सुवर्णशंख पुरस्कार मिळाला आहे. डच दिग्दर्शिका अॅलीओना व्हॅन देर होर्स्त यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केलं असून इल्जा रोमन्स यांनी निर्मिती केली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्यावतीने (Information and Broadcasting Ministery) आयोजित केलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

२९ मे ते ४ जून या कालावधीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा समारोपाचा दिमाखदार सोहळा आज पार पडला. यावेळी राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Governer Bhagat Singh Koshyari), केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन (Dr. L. Murugan) तसेच सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते श्याम बेनेगल (Shyam Benegal), पत्र सूचना कार्यालय, पश्चिम विभागाचे महासंचालक मनीष देसाई (Manish Desai) आणि मिफ्फ महोत्सव संचालक आणि फिल्म्स डिव्हीजनचे महासंचालक रवींद्र भाकर (Ravindra Bhakar) हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

- Advertisement -

भारतातील साक्षात्कारम या मल्याळी आणि फारो बेटांवरील ब्रदर ट्रोल या लघुपटांना विभागून सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला असून रौप्य शंख, अडीच लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असे ह्या पुरस्काराचे स्वरुप आहे.

तर, ‘प्रिन्स इन ए पेस्ट्री शॉप’ या अॅनिमेशनपटाला सर्वोत्कृष्ट अॅनिमेशनपटाचा रौप्य शंख पुरस्कार प्राप्त झाला आहे. इटालियन चित्रपटकर्मी  निकोला पिव्होसन दिग्दर्शित आणि निर्मित ‘क्लोज्ड टू द लाइट’ला आंतरराष्ट्रीय श्रेणीतील ‘प्रमोद पती- सर्वोत्तम अभिनव /प्रायोगिक चित्रपट’ साठी विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला. त्याशिवाय ज्यूरी विशेष उल्लेखनीय चित्रपटाचे प्रशस्तीपत्र पुरस्कार भारतातील घर का पता आणि लॅपचेस आर व्हानिशिंग या लघुपटांना मिळाला आहे.

- Advertisement -

मीना रॅड (फ्रान्स), एस. नल्लमुथू (भारत), अनंत विजय (भारत), जॉन पिएर सेरा(फ्रान्स) आणि डॅन वॉलमन (इस्राएल) या मान्यवरांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागासाठी परीक्षक म्हणून काम पहिले.

राष्ट्रीय स्पर्धा गट चित्रपट पुरस्कार

राष्ट्रीय स्पर्धा गटातील चित्रपटाच्या 60 मिनिटांपर्यंतचा माहितीपट पुरस्कार या गटातील सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार, भारतातीलच, ‘स्क्रीमिंग बटरफ्लाईज या माहितीपटाला मिळाला आहे. आसामी अभिनेत्री अॅमी बरूआ यांनी ह्या माहितीपटाचे दिग्दर्शन केले असून, निर्मिती माला बरूआ यांची आहे. रौप्य शंख, पाच लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन पटाचा राष्ट्रीय पुरस्कार

राष्ट्रीय पुरस्कारांच्या गटात, सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन पटाचा पुरस्कार भारताच्या कंडीट्टून्दु (सीन इट) या अॅनिमेशन पटाला  मिळाला आहे. आदिती कृष्णदास यांनी याचे दिग्दर्शन केले असून, नीलिमा एरियात यांनी निर्मिती केली आहे. रौप्य शंख, तीन लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

दादासाहेब फाळके चित्रनगरी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शन पुरस्कार

दादासाहेब फाळके चित्रनगरीचा सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शनाचा पुरस्कार, भारतातील “राधा’ या अॅनिमेशन पटाचे दिग्दर्शक, बिमल पोद्दार यांना मिळाला आहे.  एक लाख रुपये, चषक आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा आयडीपीए पुरस्कार

आयडीपीएतर्फे दिला जाणारा, विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पुरस्कार, अॅनिमेशन पट, मेघा’ ला देण्यात आला आहे. एक लाख रुपये, चषक आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ऋषि भौमिक यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

तांत्रिक पुरस्कार

सर्वोत्कृष्ट छायाचित्रण:

सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार, जर्मनीच्या ‘अमंग अस विमेन’ या चित्रपटाचे छायाचित्रकार बर्नार्दो कोर्न्जेओ पिंटो यांना मिळाला आहे. अमंग अस विमेन’ चित्रपटाची कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात छायाचित्रकाराची भूमिका महत्वाची आहे. यातली छायाचित्रणाची सहजशैली, आणि प्रेक्षकांची पकड घेणाऱ्या प्रतिमा नैसर्गिक उजेडात शूट केल्याने, त्या प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात.

राष्ट्रीय  पुरस्कार

भारतातील ‘ईफ मेमरी सर्वज मी राईट’ या माहितीपटासाठी छायाचित्रकार रफीक ईलियास यांना हा पुरस्कार मिळाला आहे. दीड लाख रुपये रोख, चषक आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सर्वोत्कृष्ट ध्वनिरचना:

आंतरराष्ट्रीय  पुरस्कार

सर्वोत्कृष्ट ध्वनीरचनेचा पुरस्कार, पनामाच्या ‘फॉर युवर पीस ऑफ मेक युवर ओन म्युझियम’ या लघुपटांसाठी जोस रोमर यांना मिळाला आहे. फॉर युवर पीस ऑफ मेक युवर ओन म्युझियमसाठी वापरण्यात आलेली ध्वनिरचना अत्यंत प्रभावी ठरली आहे. ज्यामुळे, मुख्य व्यक्तिरेखा आणि तिचे जग यातील आत्मीयता प्रेक्षकांपर्यंत अधिक उत्कटतेने पोहोचते.

राष्ट्रीय  पुरस्कार

भारतातील किकिंग बॉल्ससाठी प्रीतम दास यांना हा पुरस्कार मिळाला आहे. दीड लाख रुपये, चषक आणि प्रशस्तीपत्र असे ह्या पुरस्काराराचे स्वरुप आहे.

सर्वोत्कृष्ट संकलन :

आंतरराष्ट्रीय  पुरस्कार

सर्वोत्कृष्ट संकलनासाठीचा आंतरराष्ट्रीय  पुरस्कार  भारतातील ‘धोबी घाट’ या माहितीपटाचे संकलक, एस. षन्मुगानन्द यांना मिळाला आहे. दिड लाख रुपये, चषक आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

राष्ट्रीय  पुरस्कार

सर्वोत्कृष्ट संकलनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार ‘बांबू बॅलेड्स’ या माहितीपटाचेसंकलक साजेद पी. सी. यांना मिळाला आहे. दिड लाख रुपये, चषक आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -