घरमुंबईनिजामुद्दीन मरकजप्रकरण : कल्याण - डोंबिवलीतील १२ जणांना केले होम क्वॉरंटाईन

निजामुद्दीन मरकजप्रकरण : कल्याण – डोंबिवलीतील १२ जणांना केले होम क्वॉरंटाईन

Subscribe

निजामुद्दील दर्गा येथील कार्यक्रमाला गेलेल्या कल्याण - डोंबिवलीतील १२ जणांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

दिल्ली येथील निजामुद्दील दर्गा येथील कार्यक्रमाला राज्यभरातून अनेकजण गेल्याची माहिती उजेडात आल्यानंतर आता कल्याण डेांबिवलीतील अनेकजण कार्यक्रमाला गेल्याची माहिती समोर येत आहे. त्यातील १२ जणांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. देशात आणि राज्यातही कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कल्याण डोंबिवली शहरातही आतापर्यंत १९ जण कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. केंद्र व राज्य सरकारकडून कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करीत असतानाच दिल्लीत झालेल्या तबलीगी कार्यक्रमात देश विदेशासह राज्यातील विविध भागातून अनेकजण उपस्थित राहिले आहेत. त्या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहितीही उजेडात येत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता आणखीनच वाढली आहे. मुंब्रानंतर आता कल्याण डोंबिवलीतूनही काही जण त्या कार्यक्रमाला गेल्याची माहिती समोर येत आहे. त्यातील १२ जणांना पोलिसांनी होम क्वॉरंटाईन केले आहे. त्यामुळे आणखीही काहीजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असल्यास त्यांनी समोर येऊन माहिती सांगावी, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -

जंतूनाशक आणि धूरफवारणी मोफत

कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रसार आणि प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी महापालिका अनेक उपाययोजना राबवित आहे. संपूर्ण महापालिका क्षेत्रात घनकचरा व्‍यवस्‍थापन विभाग आणि अग्निशमन विभाग महापालिकेमार्फत जंतूनाशक फवारणी आणि धूर फवारणी करण्‍यात येत आहे. कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका अथवा महापालिकेच्‍या कोणत्‍याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून याबाबत कोणतेही शुल्‍क महापालिका आकारणार नसून, जंतूनाशक फवारणी ही पूर्णतः विनाशुल्‍क करण्‍यात येत आहे.

महापालिका क्षेत्रात जंतुनाशक फवारणी अथवा धूर फवारणी करण्यासाठी कोणत्‍याही एजंन्‍सीनी पैशाची मागणी केल्‍यास महापालिकेकडे ०२५१-२२११३७३ या दूरध्‍वनी क्रमांकवर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्‍या घनकचरा व्‍यवस्‍थापन विभागामार्फत करण्‍यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – श्रीराम नवमीनिमित्त अनुष्काने केली खास ‘मेजवानी’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -