सपाचे आमदार अबू आझमींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांना अटक; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी (abu azmi) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांना अटक (arrested) केल्याची माहिती समोर येत आहे. अबु आझमींना धमकी (threatening to kill) दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

Abu Azmi
अबू आजमी

समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी (abu azmi) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांना अटक (arrested) केल्याची माहिती समोर येत आहे. अबु आझमींना धमकी (threatening to kill) दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास या आरोपींना अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांनी पुण्यात ही कारवाई केली आहे. (two accused arrested by mumbai police for threatening to kill to abu azmi)

सपाचे आमदार अबु आझमी यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या निर्णयाला सभागृहात विरोध केला होता. या विरोधानंतर आझमींना फोनवरून शिवीगाळ करत, जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर अबु आझमी यांच्या खाजगी सचिवांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती.

कुलाबा पोलिस ठाण्यात (colaba police station) दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पुण्यातून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच, एक आरोपी नाशिकचा (nashik) असल्याची माहिती मिळते. या आरोपींना न्यायालयात (court) हजर करण्यात येणार आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २९ जून रोजी राजीनामा दिला. फेसबूक लाईव्हच्या (Facebook Live) माध्यमातून जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली होती. मात्र, त्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळांची बैठक झाली. त्या बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या निर्णयाला मंजूरी देण्यात आली होती. त्यानंतर सपाचे आमदार अबु आझमी यांनी सभागृहात या निर्णयाला विरोध केला होता.

शिवाय, विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात बहुमत चाचणी करण्यात आली. त्यावेळी या चाचणीत सपाचे आमदार तटस्थ होते.


हेही वाचा – …आणि उपमुख्यमंत्र्यांनी हाताला धरून मुख्यमंत्र्यांना खुर्चीत बसवले