Homeक्राइमMobile Theft : चोरीप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगारासह दोघांना अटक; विक्री केलेले 23 मोबाइल...

Mobile Theft : चोरीप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगारासह दोघांना अटक; विक्री केलेले 23 मोबाइल जप्त

Subscribe

मोबाईल चोरीप्रकरणी एका रेकॉर्डवरील गुन्हेगारासह दोघांना मालाड पोलिसांनी अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी चोरीसह विक्री केलेले 23 मोबाइल जप्त केले आहेत.

मुंबई : मोबाईल चोरीप्रकरणी एका रेकॉर्डवरील गुन्हेगारासह दोघांना मालाड पोलिसांनी अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी चोरीसह विक्री केलेले 23 मोबाइल जप्त केले आहेत. मोहम्मद सईद सिराज शेख आणि इम्तियाज उस्मान शेख अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (two arrested with criminal on record in mobile theft case; 23 stolen mobiles seized)

नोव्हेंबर महिन्यांत मालाड येथील खांडेकर कंपाऊडमधील एका रुममध्ये प्रवेश करून अज्ञात व्यक्तीने तीन मोबाइलची चोरी केली आणि तो पळून गेला होता. याप्रकरणी मालाड पोलिसांत मोबाइल चोरीचा गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पन्हाळे, पोलीस निरीक्षक संजय बेडवल यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तपास सुरू केला होता. आरोपीचा शोध सुरु असताना मालाड येथून मोहम्मद सईदला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

हेही वाचा – Drugs Smuggling : चार कोटींच्या ड्रग्ज तस्करीप्रकणी अकराजणांना अटक; चरस, हेरॉईन, गांजा, एमडी कोकेन जप्त

तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मोबाईल चोरीचे मालाड, कांदिवली, मालवणीसह इतर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहे. गर्दीचा फायदा घेऊन तसेच घरात घुसून तो मोबाईल चोरी करुन पलायन करतो. चोरीचे मोबाईल विक्रीसाठी तो मालाडच्या मालवणीतील एनसीसी कंपाऊंडचा रहिवाशी असलेला इम्तियाजला देत होता. या दोघांनी आतापर्यंत 23 मोबाईलची चोरी करुन त्याची विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर मालवणी परिसरातून इम्तियाजला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीसह विक्री केलेले 23 मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहे.

हेही वाचा – Ramdas Athawale : डॉ. आंबेडकरांवरील विधानावरून विरोधकांनी शहांना घेरले, रामदास आठवले काय म्हणाले


Edited by : Ashwini A. Bhatavdekar