घरमुंबईमुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये दोन ब्लॉगर्सनी उघडले रेस्टॉरंट! व्हिडीओ होतोय व्हायरल

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये दोन ब्लॉगर्सनी उघडले रेस्टॉरंट! व्हिडीओ होतोय व्हायरल

Subscribe

मुंबईकरांना लोकल ट्रेनची गरज काय आहे हे तेव्हाच कळू शकते जेव्हा एक तासभरही ट्रेन ठप्प झाल्यानंतर.

मुंबई : मुंबईची लाइफ लाइन म्हणून ओळख असलेल्या लोक ट्रेनचा प्रवास प्रत्येक चाकरमान्यांना करावाच लागतो. तीच रोजची गर्दी आणि तेच रोजची धावपळ. परंतू त्याच उत्साहाने मुंबईकर रोज लोकलने प्रवास करतो. असे जरी असले तरी याच लोकल ट्रेनमध्ये मस्तपैकी रेस्टॉरंट असले तर कसे वाटेल. नक्कीच सगळ्यांनाच आवडेल. असेच एक रेस्टॉरंट मुंबईतील दोन ब्लॉगर्सनी उघडल्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असून, यामागील सत्य काय आहे ते जाणून घेऊयात. (Two bloggers opened a restaurant in Mumbais local train! The video is going viral)

मुंबईकरांना लोकल ट्रेनची गरज काय आहे हे तेव्हाच कळू शकते जेव्हा एक तासभरही ट्रेन ठप्प झाल्यानंतर. या लोकल ट्रेनमध्ये एवढी गर्दी असते की पाय ठेवायलाही जागा नाही. लोक लटकत प्रवास करताना दिसतात. अशा परिस्थितीत दोन ब्लॉगर्सनी लोकल ट्रेनच्या बोगीत छोटे आणि तात्पुरते रेस्टॉरंट उघडून प्रवाशांना आश्चर्याचा धक्का दिला. आता तुम्ही विचार करत असाल की लोकल ट्रेनमध्ये रेस्टॉरंट कसे असू शकते, तर चला या व्हायरल व्हिडिओवर एक नजर टाकूया.

- Advertisement -

काय आहे त्या व्हायरल व्हिडीओमध्ये?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन व्लॉगर्स दिसत आहेत, जे सांगत आहेत की, त्यांनी मुंबई लोकलमध्ये फाइव्ह स्टार रेस्टॉरंट उघडले आहे. ट्रेनमध्ये असे रेस्टॉरंट उघडण्याचे विसरून जा, ते उघडण्याचा विचारही कोणी केला नसेल. सर्वात आधी या तरुणांनी ‘टेस्टी तिकीट’ नावाच्या या रेस्टॉरंटची माहिती जास्तीत जास्त लोकांना देण्यासाठी काही निमंत्रण पत्रिका बनवल्या. त्यानंतर रेल्वे स्टेशनवर बसलेल्या लोकांमध्ये ती पत्रे वाटली. या पत्रावर लिहिलेल्या तारखेनुसार या रेस्टॉरंटचे उद्घाटन 8 ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आले होते. उद्घाटनात लोकांना मोफत जेवण दिले जाईल, असे सांगण्यात आले. जेवण असे तसे नाही तर चक्क फाइव्ह स्टार रेस्टॉरंट सारखे.

हेही वाचा : RAJASTHAN ELECTIONS 2023 : महिलांना दरवर्षी 10,000 रुपये; काँग्रेसचा तीन मुद्द्यांवर भर

- Advertisement -

…आणि प्रवाशाना वाढले जेवण

व्हिडीओ बनवणाऱ्या ब्लॉगर्सनी व्हायरल केलेल्या व्हिडीओमध्ये दिसतेय की, लोकल ट्रेनच्या डब्यात जेवणाचे टेबल लावले, त्यावर पांढरे कापड पसरले होते. यानंतर दोन प्रवाशांना जेवण देण्याची प्रक्रिया सुरू केली. वर ओरेगॅनो असलेल्या व्यक्तीला जिलेबी देण्यात आली. तर दुसऱ्या व्यक्तीला केचपसोबत मॅगी देण्यात आली. यानंतर गोड मिठाई देण्यात आली. या दोघांनीही मोठ्या उत्साहाने दिल्या जाणाऱ्या जेवणाचा आस्वाद घेतला आणि या तरुणांना मोठ्या प्रेमाने खाऊ घातला. यानंतर डिश ट्राय करणाऱ्या लोकांकडूनही फीडबॅक घेण्यात आला, ज्यांनी सांगितले की, त्यांना हे पंचतारांकित रेस्टॉरंट खूप आवडले आहे.

हेही वाचा : “…तर जरुर गुन्हे दाखल करा”, मनोज जरांगेंचे सरकारला थेट आव्हान

खरे काय ते जाणून घ्या

मुंबई लोकल ट्रेनमध्ये उघडण्यात आलेल्या फाइव्ह स्टार रेस्टॉरंटच्या व्हिडीओमागील सत्यता वेगळीच आहे. असे कुठल्या प्रकारचे रेस्टॉरंट उघडण्यात आले नसून, दोन ब्लॉगर्सनी एकत्र येत हा एक व्हि़डीओ बनवला असून, मुंबईकरांनीसुद्धा याकडे व्हिडीओ म्हणूनच बघावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -